विषय क्र.५ -गणेशाकडून काय शिकावे?

लेखिका -सौ.स्वरूपा कुलकर्णी


एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारीणम्।

रूदं चं वरदंहस्तैर् बिभ्राणम् मुषकध्वजम्।

रक्तं लंबोदरम् शुर्पकर्णकम् रक्तवाससम्।

रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैःसुपूजितम्।


गणपती बाप्पाकडून काय शिकावे असं विचारलंत तर गणरायाच्या सर्व अंगांचा अभ्यास करावा लागेल.गणपती बाप्पाचं डोकं हे भले मोठे आहे आणि याचा अर्थ म्हणजे मोठे डोके चारी बाजूंनी चौकटीबाहेरचे विचार करण्यासाठी आहे.

गणपती बाप्पाचे डोळे देखील मोठे आहेत याचा अर्थ असा की,समोर जे दिसते त्यापलीकडे पाहण्यासाठी.

गणपती बाप्पाचे कान सुपासारखे असतात या सुपासारख्या कानांचा अर्थ इतरांचे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी.

एका हातात कुऱ्हाड मोहाची बंधने कापण्यासाठी, आसुरी संस्कार मुळापासून तोडण्यासाठी.

महोदर तो आहे.चांगल्या वाईट गोष्टी शांततेने सामावून घेण्यासाठी.

एकदंत आहे.चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी त्याग करणेही गरजेचे.

एका हातात मोदक परिश्रम तपस्या आणि बुद्धिबळाच्या आधारावर यश प्राप्त केल्याचे सूचक.

मूषक वाहन मनाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची गणरायांची इच्छा.

या प्रत्येक गोष्टीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. यातून योग्य तो बोध घ्यावा. गणपतीची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. अश्याच विघ्न विनाशकाच्या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक संकट, विघ्न, आळस, रोग, बेकारी, धनाभाव व इतर समस्यांचे तत्काल निवारण होतं.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न