जीवना तव सुंदरता सुंदर होण्यात सरे...
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
कविश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी केलेलं हे विधान किती सार्थ आहे हे रोजच्या जगण्यात आपण पावलो पावली अनुभवतो.या वाक्यात जगण्याची धडपड व त्यातून घडणारे आपण ही लढाई खऱ्या अर्थाने टिपली आहे...बरोबरच बोलले ते जगण्याशी चाललेली नित्य झकड-पकड व त्यातले डाव कधी जिंकतांना कधी हरतांना नकळत आपण स्वतःच स्वतःला घडवत जातो..एखाद्या कसलेल्या मुरब्बी कलाकाराच्या शिल्पासारखे.सहज, नैसर्गिक तरिही सुबक,वेगळेपण जपलेले...ही त्या विश्वनियंत्याची खरी ताकद आहे.आपण घडत जातो " तो" घडवत जातो...ते अनोखे शिल्प घडायला कितीतरी नाट्य,वेळ,पैसा,शक्ती,विचार अशा अनेक गोष्टी खर्ची पडत असतीलही पण मंडळी हीच तर त्या विधात्याची साधन सामग्री आहे..याच साधनांचा वापर होऊनच घडते ते एक परिपक्व सुंदर व्यक्तिमत्व..विधात्याच्या अफलातून कौशल्यानेच साकारतो तो परिपक्व मानव..ही सुंदरता मिळवायला त्या मानवाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागते.तो शिकतो, कधी पडतो धडपडतो पण पुढे चालत रहातो.मार्ग कितीही घनघोर असो, तो पुढेच जात रहातो.मानवी आयुष्याची ही खरी जमेची व तितकीच कठीण बाजू की अपार परिश्रमातूनच शेवटी यश मिळते..ते सुंदर यश मिळवायला आधी आपलाच कस पाहिला जातो हे तितकेच खरे..
म्हणूनच कुसूमाग्रजांनी केलेलं विधान १०० टक्के खरे..
जीवना तव सुंदरता सुंदर होण्यात सरे...
Comments
Post a Comment