'गणेश उत्सवाची परंपरा

लेखिका - सौ.स्वरूपा कुलकर्णी


 

        राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असणार्‍या मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीला ऐतिहासिक सोबतच धार्मिक, अध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेला असून, या ठिकाणी सुमारे ३५०वर्षापूर्वी श्री संत गोसावीनंदन यांनी स्थापन केलेल्या गणेश उत्सवाची परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे. 

        नेत्री दान हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजरे, माया शेंदुर पाझरे, वरोवरी दुवांकराचे तुरे

         या स्तवनाचे रचयिते संत गोसावीनंदन यांच्या महतीचा अध्यात्मिक वारसा मातृतिर्थ नगरीला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन असणारे येथील संतवर्य गोसावीनंदन स्वामी यांचे पूर्वज मराठवाड्यातील बिड (गंगातीर) येथील राहणार असून, गोसावीनंदन स्वामींनी श्रीक्षेत्र मोरगाव येथील तपश्‍चर्या केल्यावर त्यांना साक्षात गणपतीने दर्शन देऊन सिद्धक्षेत्र सिंदखेडराजा येथे जाण्याची आज्ञा केली, अशी अख्यायिका आहे. गोसावीनंदन यांचे चरित्र अभंगावरुन ते प्रत्यक्षात श्री गणेशाचेच अवतार होते असे म्हणतात.येथील त्यांच्या वास्तव्य काळामध्ये श्री गोसावीनंदन यांनी रचलेली अनेक गणेशस्तवन, आरत्या, देवीचे पदे, कवणे प्रचलीत असून त्यांचा एक काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला आहे. गोसावीनंदन यांनी ३५० वर्षापूर्वी सुरु केलेला गणेशोत्सव आजही त्याच श्रद्धेने मातृतिर्थ नगरीत साजरा होतो. काळ्या मातीपासून पर्यावरण पुरक उत्सव मुर्ती दरवर्षी स्थानिक शिल्पकार तयार करतात. या मुर्तीची प्रतिष्ठापणा करुन गणेशोत्सव साजरा केला जातो.

         त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. "लोकमान्य टिळकांनी १८९४ साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्षं आधी म्हणजेच १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती," असे रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात.

          तर पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९३ साली झाल्याचं मत इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिलं आहे. "भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर या तिघांनी मिळून १८९३ साली पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती."

           तर ही आहे आपल्या गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्रात दर वर्षी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने व हर्ष-उत्साहाने घरोघरी साजरा केला जात आहे. 


       एकदंत वरदवरदविनायक

       भालचंद्रा तू विघ्नविनाशक,

       द्याया सद्बुद्धी भक्तासी

       रूप घेसी सुखकारक तू।


        मी अजाण तव रूप मनोहर

        वर्णू कैसे मतीने अल्प,

        सिंधूरवदना लंबोदरा तू

        पाही बा कृपादृष्टीने मजला नित्य।

    

            

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न