विषय क्र.३- ते दहा दिवस कसे साजरे होतात?

लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी


भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पा सगळ्यांच्यां घरात विराजमान होतात. दरम्यान, १० दिवसांनी या गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवस तर काही  ठिकाणी पाच दिवसांनीही गणपतीचे विसर्जन केले जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये हा गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

        रोज सकाळ संध्याकाळ बाप्पाची पुजा अर्चा घरोघरी चालते.पार्थिव गणेशाला रोज २१ दुर्वांची जुडी वाहिली जाते.जास्वंद,गुलाब यांसारखी लाल फुले बाप्पाला विशेष प्रिय..तीसुद्धा हार बनवून वाहिली जातात.रोज पंचखाद्यांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो.बाप्पाला घरातली बच्चे कंपनी तर जीवापाड प्रेम करते.शेवटच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतांना हमसून हमसून रडणारी ही निरागस बाळं बाप्पाला विसर्जित करतांना खूप हळवी होतात.किती जीव लावून जातो बाप्पा या १० दिवसांत.जणू आपल्या घरातील एक मोदकप्रिय सदस्य म्हणून त्याला मानाचे स्थान मिळते.बाप्पाच्या आवडीनिवडी जणू आपल्याच जिवनाचा भाग होऊन जातात.मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की गणपती १० दिवसच का विराजमान असतात. १० दिवसांनी गणपतीचे विसर्जन करण्याचे एक खास कारण आहे. याचा संबंध महाभारताशी संबंधित आहे. 

असे म्हटले जाते की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. सोबतच पौराणिक कथांमध्ये असाही उल्लेख आहे की गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले होते. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना करण्यासाठी गणपतीला लिहिण्याची विनंती केली आणि गणपतीला सांगितले होते की लिहिण्यास सुरूवात केल्यानंतर पेन थांबले नाही पाहिजे. जर पेन लिहायचे थांबले लिहिणे बंद करावे लागेल. तेव्हा महर्षी वेदव्यास यांनी सांगिते की देवा तुम्ही सगळ्यात विद्वानांपेक्षा थोर आहात आणि मी सामान्य ऋषी जर श्लोकांमध्ये काही चूक झाली तर लिपिबद्ध करताना ती चूक सुधाराल. या पद्धतीने महाभारताचे लिखाण सुरू आहेअनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महााभारताचे लेखन पूर्ण झाले तेव्हा गणपतीचे शरीर जड झाले होत. अजिबात न हलल्यामुळे त्याच्या शरीरावर धूळ माती जमली होती. तेव्हा गणपतीनने सरस्वती नदीमध्ये स्थान करत आपले शरीर साफ केले होते. म्हणूनच गणपतीची स्थापना १० दिवस केली जाते आणि त्यानंतर गणपतीचे विसर्जन होते. गणेशोत्सवाला अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर १० दिवस हे आपल्याला संयमी राहण्यासाठी तसेच आपल्या मनावरील विचारांची धूळ बाजूला सारण्याचे पर्व आहे. 

        गणपती विसर्जनाच्या दिवशी जड अंतःकरणाने 

 गणपती बाप्पा मोरया म्हणत त्याचे विसर्जन केले जाते.खरं सांगायचं तर बाप्पाचा उत्सव काल समाप्त होतो पण तो मात्र आपल्या अंतःकरणात मानाचे स्थान मिळवून जातो..

           मोरया मोरया मी बाळ तान्हे,

           तुझीच सेवा करू काय जाणे,

           अज्ञान माझे कोट्यानू कोटी,

           मोरेश्वरा बा तू घाल पोटी

           भक्तासी विद्या परिपूर्ण द्यावी

           अनेक माझ्या ह्रदयासी लागावी


मंगलमूर्ती  मोरया, गणपती बाप्पा मोरया

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न