विषय- "काकस्पर्श"
कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी
"काकस्पर्श"
पिंडास स्पर्श होता,
आत्मा क्षणात शांत होतो,
जणू मृत पुर्वजांना
तूच समाधान देतो
पितरांची अवगुंठलेली
गती तुझ्याने मिळते
जरी काळा रंग तुझा
स्पर्शाने मुक्ती मिळते
रे काव काव करिशी,
एकाक्ष तुजं म्हणती
रे तूजविण मानवाला,
ना सद्गती या जगती
राहती पिढ्यान पिढ्या
मर्त्यलोकी या मानवाच्या,
तुजविण कावळ्या रे
तडफडती पिंडात ह्या
धन्य तुझी दृष्टी रे काक
शोधसी योग्य पिंडास,
तुझ्या स्पर्शाने केली
मुक्ती सदैव मानवास
Comments
Post a Comment