खेळ मनाचा

 


सौ.स्वरूपा कुलकर्णी

किती छान असतो ना हा खेळ मनाचा,

एकांतात मुक्ततपणे तूझ्या आठवणीत रमण्याचा,

तू सोबत नसता तुला क्षणक्षण आठवण्याचा,

मनातल्या घोड्यांना स्वैर उधळू देण्याचा


किती छान असतो ना हा खेळ मनाचा,

राहून राहून तुझी याद करत राहण्याचा,

शेवटच्या भेटीतील तूला स्ममरण्याचा,

दिशाहीन मनाला मुक्त उधळू देण्याचा


किती छान असतो ना हा खेळ मनाचा,

पंजाबी ड्रेसमधल्या तूला फोटोत पहाण्याचा,

सोडलेल्या बटा तुझ्या मनानेच सावरण्याचा,

चेहऱ्यावरील गोड हसू पुन्ह पुन्हा पहाण्याचा


किती छान असतो ना हा खेळ मनाचा,

रंग बावरी स्वव्पे तारूण्नात पहाण्याचा,

दुर राहाणाऱ्या तुला बसस्टॉपवर पहाण्याचा,

माझ्या सिटाशेजारीच येऊन बसण्याचा


किती छान असतो ना हा खेळ मनाचा,

आपली कधीही न झालेली तू दूर होतांना बघण्याचा,

विनाकारण तूला आत मनात साठवायचा,

नको नको म्हणतांनाही परत चुका करण्याचा



Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न