#_जागर_आदिशक्तीचा

        विषय क्र. ४- नवरात्रीचे उपवास श्रद्धा अंधश्रद्धा

         लेखिका-सौ.स्वरूपा कुलकर्णी


     उपवास या शब्दाचा अर्थ देवाजवळ रहाणे होय.मनाने अनुसंधान करणे व शरीरही त्यालायक बनवणे हे अपेक्षित असते.नवरात्रीच्या  ९ दिवसात बऱ्याच ठिकाणी ९ दिवस उपवास केला जातो.तो कुलाचार रितीनुसार पहायला मिळतो.त्यामागे अनेक शास्त्रिय कारणे आहेत.हा उपवास शरीराला अधिक उर्जावान बनवतो.शरीराची ताकद वाढवण्यात उपवासाचा खूप मोठा वाटा असतो.हा केवळ शरीराला रोजच्या अन्नापासून दूर ठेवून वजन कमी करण्यासाठी केला जाणारा प्रकार नसून याला खूप मोठे अध्यात्मिक महत्व आहे.देवीची कृपा लाभावी असा उद्देश आहेच तसेच शरीरही उर्जावान बनवण्याचा हितसंकल्पही आहे.जर शरीर धड तर सगळं ठीक.नाहीतर आपण आजारांच्या विळख्यात सापडतो.देवीच्या आराधनेत मनाप्रमाणे शरीराचीही तयारी उत्तम हवी असा यामागचा दृष्टीकोन आहे.

     नवरात्रीचा पारंपारिक आहार हा आपल्या पचन अग्नीला शमवतो. खालील प्रमाणे बऱ्याच ठिकाणी हा उपवास केला जातो.

     शिंगाड्याच्या पिठाची पोळी. वरीचे तांदूळ, वरीच्या तांदळापासून बनवलेले घावन, साबुदाण्याचे पदार्थ, शिंगाड्याचे पीठ, राजगिरा, उकडलेले रताळे इत्यादी.

साजूक तूप, दुध आणि ताक. हे आपल्या शरीराला शीतलता देऊ करतात.

दुधीभोपळा आणि लालभोपळा दह्यात कालवून.

भरपूर द्रव्य पदार्थ – शहाळे, रस, भाज्यांचे सूप इत्यादी. हे उर्जा तर प्रदान करतातच शिवाय शरीराचे निर्जलीकरण होऊ देत नाही आणि उपवासा दरम्यान शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात.

पपई, नाशपती आणि सफरचंद यांपासून बनविलेले फळांचे सॅलड.

जेव्हा पारंपारिक नवरात्रीचा आहार घेतल्या जातो तेव्हा खालील गोष्टी पाळतात.

स्वयंपाकात नेहमीचे साधारण मीठ वापरण्याऐवजी शेंदेलोण वापरतात.

भाजणे, उकडणे, वाफवणे आणि विस्तवावर शेकणे यासारख्या आरोग्यकारक शिजवण्याच्या पद्धतींचा वापर करतात.

काटेकोरपणे शाकाहारी राहातात.

पहिले काही दिवस धान्य टाळतात.

कांदा आणि लसूण टाळतात.

अति प्रमाणात अन्न ग्रहण करणे टाळतात.

जे उपवास करू शकत नाहीत त्यांनी मांसाहार, मदिरा, कांदा, लसूण आणि मसाले यांच्यापासून दूर रहावे असेही सांगितले जाते.

       शरीर उपवास करायला असमर्थ असेल तर मात्र उपवास करू नये.शरीराला अधिक ताणू नये.नवरात्रीचे उपवास एकभूक्त राहूनही करता येतात.हा सगळा शेवटी श्रद्धेचा भाग आहे.काही लोक याला अंधश्रद्धा मानतात हा त्यांचा दृष्टीकोन आहे.परंतू यामागची शास्त्रिय बैठक पाहिली तर या अश्विन महिन्यात ऋतुमानानुसार उपवास करणे हितावह ठरते असे सांगितले जाते.

   अशाप्रकारे आपले पारंपारीक उपवास,व्रतवैकल्य आपल्याला मनाची व शरीराची मशागत करायला सांगतात.यात सर्वांचे भौतीक व अध्यात्मिक कल्याण सामावलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न