विषय क्र ४- भक्ती ही श्रद्धेची असावी

लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी


मानवाला ज्या क्षणी तो या चैतन्यमयी विश्वात्मक परमेश्वराचा अंश आहे ह्या गोष्टीची जाणीव झाली त्या क्षणी तो त्या शक्तीपुढे नतमस्तक झाला.याचे कारण माणसाला जेंव्हा हे जग समोर दिसले तेंव्हा तो हरखून गेला.किती विविध रंग,रूप, आकार,चव, रस, गंध, भावना या सगळ्या सृष्टीच्या विविधता पाहून तो विचारात पडला.खरंच हे सुंदर विश्व बनवणारा कोण असेल?कुठे असेल कसा असेल?त्या क्षणी भगवंत समोर प्रगट झाले व त्याला आपल्या अत्यंत मधूर वाणीने म्हणाले, वत्सा मी सर्वांतरयामी परमपीता परमेश्वर आहे.माझे स्थान चराचरात आहे.त्यातही प्रामुख्याने मी सश्रद्ध भक्ताच्या ह्रदयात रहातो.ते माझे अत्यंत आवडते स्थान आहे.

                खरंच वरील गोष्ट काल्पनिक असली तरी तीला सत्याचा भरभक्कम आधार आहे.आज आपण साजरा करत असलेला गणेशोत्सव याच परमेश्वराचे स्मरण,पुजन,वंदन आहे. त्या सत-चित्-आनंदमयी परमात्म्याला शरण जाऊन भोळ्या भक्तीभावाने त्याची प्रार्थना करणे हेच या गणेशोत्सवाचे प्रयोजन.मन पुर्णपणे गणेशाला शरण गेले की तो भक्ताला मनोवांछित फळ देतो.श्रद्धेने केलेली भक्ती समृद्धी,पूर्णता व अंती मोक्ष मिळवून देते.श्रद्धेची ताकद असीम आहे.

                गणनायकाला आवाहन करतांना अथर्वशिर्षात आपण म्हणतोच" त्वं आनंदमय त्स्वं ब्रह्ममय:" म्हणजेच गणेश किंवा अखिल विश्वनियंता परमात्मा हा आनंदस्वरूप आहे .त्याला रंग,रूप,रस,गंध नंतर प्राप्त झाले.पण मुळात त्याचे स्वरूप आनंदमय आहे.तो निर्गुण निराकार असूनही भक्तांसाठी सगुण साकार रूपात प्रगटला.त्याच्या मायेच्या साम्राज्यात आपण त्याचे व आपले मूळ नातेच विसरून गेलो.त्याला विसरल्यामुळे भ्रमात मोहग्रस्त झालो.परंतू त्याच्याच कृपेने संत महंतांच्या कृपेने भक्तीची वाट चालायला शिकलो.हीच वाट पूढे मोक्षापर्यंत घेऊन जाते.एकदा मोक्ष मिळाला की जन्ममृत्युच्या चक्रातून सुटका होते हे आपण गीतेतही वाचतो. ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथभागवत,रामायण,महाभारत याच भक्तीची महिमा गातात.भक्तीला श्रद्धेची जोड मिळाली की ती भक्ती विश्वरूप धारण करते व परमात्म्याला गवसणी घालते.

                ओम् एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही।

                तन्नो दन्ती प्रचोदयात।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न