विषय क्र.२-  जल्लोश गणेशोत्सवाचा

कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी


श्रावण संपला,


रम्य चतुर्थीची पहाट झाली….


सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,


आली आली….


गणाधिशाची स्वारी आली…


गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास


घरात आहे लंबोदराचा निवास


दहा दिवस आहे आनंदाची रास


अनंत चतुर्थीला मात्र


मन होते उदास….


हरिसी विघ्न जणांचे, 


असा तू गणांचा राजा


वससी प्रत्येक हृदयी,


असा तू मनांचा राजा


स्वीकार गणराया तुझिया चरणी,


साष्टांग दंडवत माझा…

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न