जे खळांची व्यंकटी सांडो.... पसायदान म्हणजे माऊलींचे भगवंताकडे कळवळून केलेले मागणे!! त्यात कळकळ तर आहेच पण एक उच्चकोटीच्या विचारधारेचा प्रवाह आहे. मुख्य म्हणजे समाजाविषयी त्यात आत्यंतिक मायेची भावना आहे. संतांचे हे चिरंजिवी लक्षण म्हणजे सर्वांविषयी कळवळा असणे, सर्वांचेच कल्याण व्हावे ही आंतरिक इच्छा असणे हे होय. ज्ञानेश्वर माऊलींच्या वैयक्तिक आयुष्यात लहानवयात फक्त अंधःकारच होता. समाजाची "वाळित टाकलेली मुले" अशी संभावना झेलणारी आणि लहान वयातच आई वडिलांची छत्रछाया हरवलेली ही अनाथ मुले.तरीही अशा काटेरी प्रसंगातून माऊलींचा या निर्दयी समाजाविषयीचा कळवळा कुठेही कमी होतांना दिसत नाही. सज्जनांवर तर त्यांचे प्रेम आहेच पण दुर्जनांचीसुद्धा त्यांना जास्त काळजी आहे. प्रत्यक्ष भगवंतही नाना अवतार घेऊन खल प्रवृत्तीच्या माणसांना शासन करतात पण पसायदानात ज्ञानेश्वर माऊली भगवंताकडे अत्यंत करूणार्द्र भावाने म्हणते- जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे।। 'जे खळांची व्य...
Posts
Showing posts from May, 2026
- Get link
- X
- Other Apps
माझे सद्गुरू स्वामी समर्थ.. माझ्या लहानपणी आमचं घर व मागे जुन्या पद्धतीचा वाडा होता..आमच्या घरात व ह्या खोल्यांमध्ये भरपूर मोठं अंगण होतं.. तिथे नंतर फरश्याही बसवल्या गेल्या..एकूण १२ भाडेकरू इथे रहायचे.. पुर्वी घरात मोठी व्यक्ती म्हणजे आजोबा हे करारी व सर्वांना आदर वाटणारे व्यक्तिमत्व होते.. आम्ही सर्वजण त्यांना 'दादा' म्हणायचो.. पुर्वी शेतकी खात्यात असणारे व वडिलोपार्जित शेती उत्तमप्रकारे सांभाळणारे माझे आजोबा आम्हा सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते..घरात पुर्वीपासूनच देव धर्म निष्ठेने पाळला जात होता.. अग्निहोत्र, पूजा अर्चा, संध्या वंदना, जपजाप्य, कुलाचार कुळधर्म, सोवळे ओवळे खूप पाळले जात होते.. त्यामुळे नकळतच संस्कार तसेच झाले..आई बाबाही धार्मिक वृत्तीचेच त्यामुळे जगण्याच्या शाळेत नितीमुल्यांची पकड घट्टच राहिली.. ती आजही तशीच आहे.. एक माणुस म्हणून जगतांना ही संस्कारांची रूजवणूक कायम आधार बनून आहे..स्वतःचे चुकले की आत्मपरिक्षण करायची सवय लागली.. सॉरी सहज म्हणता येतं.. चुकलेलं सहज कबुल करता येतं.. माफी मागणं म्हणजे कमीपणा असं वाटत नाही.. समोरच्याला आदर द...
- Get link
- X
- Other Apps
*श्री रामकथा सुफल संपूर्ण* राम का गुणगान करीये, रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरीये... काही अनुभव हे शब्दातीत असतात तसा काहीसा अनुभव राष्ट्र सेविका समितीच्या तीन दिवसीय रामकथेतुन मला मिळाला.राम हा आनंदाचा गाभा आहेच आणि स्मरण चिंतनातुन तन,मन,बुद्धी पवित्र करतो. ह्या रामकथेतुन मिळालेला पिंपळस ग्रामवासियांचा सहवास अनमोल होता. कथा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जसे रामाने सेतुबंधन केले व हजारो वानरांचे हात त्या कार्यास लागले तसेच राहाता शाखेच्या कार्यवाहिका व इतर सेविकांच्या परिश्रमामुळे कार्य निर्विघ्न पार पडले. तीन दिवसीय कथा करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. रामेश्वर महादेवाच्या पावन सहवासात वाल्मिकींची गोड रामकथा सांगण्याचे भाग्य लाभले हे केवळ वर्णनातीत! गावातील वृद्ध महिलांनी पहिल्या दिवशी अनेक भजनं गायली. त्यात त्या तन्मय होवून गेल्या होत्या. सर्वांनाच कथेत रामजन्माचा आनंद मिळाला. श्रोत्यांची एकुण संख्या ४४ होती. लहान मुलींचीही उपस्थिती होती. संघबंधूंचेही माईक व्यवस्थेत सहकार्य लाभले. दुसऱ्या दिवशी सीता स्वयंवरात तिची सासरी पाठवणी हो...
- Get link
- X
- Other Apps
#अक्षरधनकथास्पर्धा२०२६ विषय- चरित्रात्मक कथा "सखू ए सखू..कुटं हाईस?" राधाक्का आवाज देत हुती. पायऱ्या चढतांना त्यास्नी धाप लागली. सखू वरच्या माडीच्या खोलीत आरश्यात बघुन हासत हुती. राधाक्कानी तिचं ध्यान पाहिलं नी खस्सकन हातातली लाली घेतली नी वरडली. " सखे, परिक्षा जवळ आली नी तू हितं थोबाड रंगवत बसलीस.. काय म्हणावं बाई..कसं व्हायचं सखे?" राधाक्कानी कातावून तिच्याकडं पाहिलं. " आक्के आगं तिकडं मैतरणी यात्रेला जायाची तयारी करत्यात. मीच काहुन आभ्यास करू, सांग की गं?" लाडालाडात सखू राधाक्काला इणवू लागली. " आगं पोरी नानांनी एव्हड्या हौसेनं तुला शिक्षणासाठी कालेजात पाठिवलं आन् तू परिक्षेलाच आभ्यास करीनास..आगं पास न्हाय झालीस तर मी नानांना तोंड कसं दाखवू. लई आपेक्षा हाय तुझ्याकडून सखू. दाद्याला शिक्षणाला तालुक्यात ठेवलंय हे म्हाहीती हाय नवं. तुझ्या नानांना किती हौस शिक्षणाची बाई. थोडी तरी लाज ठेव" सखू फुरंगटली.तिचं आभ्यासात काई मन रमत नव्हतं. पण नानांच्या हौशेखात...
- Get link
- X
- Other Apps
आई - सौ. स्वरूपा कुलकर्णी आज ठरवलं तुझ्याबद्दल लिहावं.. नेहमी सगळ्यांबद्दल लिहीते आज तुझ्यावरही लिहीता येतं का ते बघावं.. नेहमीप्रमाणे मोबाईलवर बोटं फिरवत राहिले..पण .. पण लिहू कशाकशावर असा विचार येताच मन गलबलून गेलं..खरं सांगते डोळ्यात पाणीच आले..किती सात्विक तुझा चेहरा पटकन समोर आला..जसं तूझा चेहरा नजरेसमोर आला तसं माझं बालपण आठवलं.. किती सुंदर दिसायचीस.. साधी कॉटनची साडी, मोठं ठसठशीत कुंकू, काळेभोर डोळे, दाट काळ्या भिवया, गहूवर्णी पण तुकतूकीत तेजस्वी चेहरा जणू रेणुकामातेचंच प्रतिबींब.. गळ्यात काळ्या मण्यांचं सुंदर मंगळसुत्रं, अतिशय सज्जन भोळा स्वभाव असं सगळं सगळं डोळ्यासमोर आलं.. किती सुंदर भजनं म्हणायचीस..त्यातही रेणुकामातेचं " माहूरगडावरी गं माहूरगडावरी गं तुझा वासं" हे भजन किती तन्मय होऊन म्हणायचीस.. नवरात्रात व इतरही कुलधर्मात तुझी लगबग, काळजी आजही आठवते.. तू आम्हाला मारल्याचं कधी आठवत नाही... शाळेत एकदा मला त्रास दिलेल्या एका मुलीला मारल्याचं आजही आठवतं.. किती चिडली होतीस तिच्यावर की माझ्या लेकराला का मारलंस म्हणून.. तुझं प्रेम, तु...
- Get link
- X
- Other Apps
*मन तृप्तं झाले आहे तुझ्या* *दर्शने।* - सौ. स्वरूपा कुलकर्णी जेंव्हापासून समज आली तेंव्हापासून( माहेरील )घरातील धार्मिक वातावरणाचा मनावर घट्ट पगडा होता व आजही आहे. मनाची घडणच इतकी सुंदर झाली की साधू संतांचे विचार, भक्तिगीते, गीता, रामरक्षा पठण , सत्संग यामुळे मन सतत अंतर्मुख होत गेलं. ही किमया माझ्या आजोबांची व आई बाबांची! लहानपणापासूनच तिर्थयात्रांना अनेकवेळा जाणे झाले.तो प्रत्येक अनुभव वेगळा आहे. मध्यंतरी आळंदी व देहूला जाण्याचा योग आला.तो अनुभव खरं तर शब्दात मांडणं कठिण आहे. कारण संतांचा सहवास आत्मिक पातळीवर समाधान देणारा असतो. तो शब्दांनी व्यक्तं करता येणार नाहीच. पण तरिही निर्गुण निरहंकार परमात्म्याला आपण सगुण रूपात पान फुले वाहतोच ना तशी ह्या अनुभूतीला शब्दबद्धं करण्याचा प्रयत्न आहे. **देवाचिये द्वारी उभा* *क्षणभरी।तेणे मुक्ति चारी* *साधियेला।हरी मुखे म्हणा हरी* *मुखे म्हणा।पुण्याची* *गणना कोण करी।।* * ज्ञानोबा माऊली सहज ओवी लिहून...