मी कशी घडले
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
मैत्रिणींनो, स्वतःला 'मी कशी घडले?' हा प्रश्न विचारणं तितकं सोपं नाहीये कारण ,स्वत:चं थोडंसं तिर्हाईतासारखं परिक्षण करणं तसं अवघडंच...पण तरिही जे मी आज आहे तशी मी काल नव्हते हे मनाने पहाण्याचा प्रवास रंजकंच..हा खट्टा मिठा प्रवास आज मी तुमच्या सोबत शेअर करतिये...
मैत्रिणींनो, माझ्याबद्दल सुरूवातीपासूनच सांगते.माझा जन्म औरंगाबादचा!मी पुर्वाश्रमीची रेणुका प्रदिप दीक्षित.रेणुका ही माहेरची कुलदेवता..म्हणून रेणुका ! तसं स्वरूपा हे नाव सर्वांच्या तोंडी..पण कागदोपत्री रेणुकाच.माझ्या अगोदर आईला एक लहान मुल होऊन ते पंधरा दिवसातंच वारलं...न्युमोनियामुळे.
आणि त्यानंतर माझा जन्म झाला.त्यामुळे घरात सगळ्यांची लाडकी.घरात नवसाने झालेल्या बाळाचा काय थाट असतो तो मी पुरेपूर अनुभवलाय. लहानपणापासूनच आजोबा,
आई,बाबा, माझा लहान भाऊ यांच्यात लाडाकोडात वाढलेली मी खरंच खूप भाग्यवान होते.याचे प्रमुख कारण होते माझे आजोबा! ते आमच्या दीक्षित घराण्याचे गुरू होते.त्यांनी गुळवणीकर महाराजांची दिक्षा घेतली होती.ते अत्यंत करारी,बुद्धिमान,तापट तरीही प्रेमळ,धार्मिक व सात्विक वृत्तीचे होते.मी भाग्यशाली आहे कारण खूप वर्ष त्यांचा सहवास मला लाभला.तशी आज्जी फार पुर्वीच वारल्यामुळे तीला मात्र फोटोतच पाहिलं.आजोबांची गुरूउपासना,संध्या,जप,पुजा वयाच्या नव्वदीपर्यंत अखंडपणे चालू राहिली.ते अतिशय कडक शिस्तिचे व वक्तशिर स्वभावाचे होते..मला त्यांच्यामुळे लाभलेले धार्मिकतेचे संस्कार जन्मोजन्म पुरतिल इतके सखोल आहेत..माझे आई व बाबाही त्यांच्याच तालमित पक्के झालेले त्यामुळे त्यांचाही धार्मिकतेकडे विलक्षण ओढा आहे..ते शुद्धशाकाहारी,सात्विक,निर्लोभी,उदार,विलक्षण प्रेमळ असे संत वृत्तीचे आहेत.मी त्यांच्या परोपकारी,समोरच्यावर सहज प्रेम करण्याच्या वृत्तीला खूप मोठं मानते..कारण ते फार दुर्मिळ आहे.आई ने घरातल्या कामवाल्या बाईलाही कधी उपाशी ठेवलं नाही व येणार्या जाणार्यांना कायम प्रेम देत रहाणं तिनं कधी थांबवलं नाही..माझे बाबा स्टेट बैंकेतून सर्विस करून रिटायर झाले पण आयुष्यात पैसा म्हणजे विनाकारण उधळायची गोष्ट असे कधी आम्हाला शिकवले नाही..कायम अंथरूण पाहून पाय पसरावे,आपले ते इतरांनाही द्यावे,अतिलोभ टाळावा,फुकट कोणाचे घेऊ नये,खोटे कधी बोलू नये,सदासर्वदा देवाची आठवण ठेवावी,करता करविता तोच आहे ही शिकवण ते शब्दातुनच नव्हे तर आचरणातुनही अधिक ठळकपणे आम्हा भावंडांवर करत गेले.
मी सुरूवातिला शाळेत बाईंच्या भितीने जायचे टाळू लागले.पण म्हणून मला घरात कोणी मार दिला नाही की कानउघडणी केली नाही.उलट वेळोवेळी मला त्या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर यावं म्हणून प्रयत्न केले गेले.मला कुठेही प्रेशर आणून शाळेत गेलंच पाहीजे हा हट्ट केला नाही.माझी काळजी इतकी होती की बाईंना वेळोवेळी सांगायचे की ती हुशार आहे घरी अभ्यासही करते पण शाळेत यायला घाबरते..त्यानंतर दुसरीच्या बाई बदलल्या व बेलसरे बाई आल्या.त्या आवडत्या झाल्यामुळे माझे शिक्षण सुरळीत झाले व मी पुढे व्यावस्थित शाळेत रूळले.आधिपासूनच अभ्यासात हुशार होते..पण माझी शरिरप्रकृती नाजुक होती..आई बाबा,आजोबांना फार चिंता असायची हीचं पुढे कसं होणार..मी जेवायलाही फार त्रास दिलाय आईला..(आता कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही😄)माझी तब्येत नाजूक .तशी मी हडकूळीच पण पुढे कॉलेजला गेल्यानंतर तब्येत छान सुधारली.
माझ्या संपुर्ण जडणघडणीत ही शाळा नावाची संस्था फार सखोल परिणाम करून गेली..कुलकर्णी बाई,देवपाठक बाई,मुळे बाई आणि इतरही अनेक शिक्षिका मनावर चांगले संस्कार कसे घडतिल याबाबतीत जागरूक राहिल्या.मी शाळेत असतांना अनेक स्पर्धा गाजविल्या.बक्षिसं मिळवली.शाळेत स्कॉलर म्हणून नाव कमवले.. मी चित्रकला,निबंध,वक्त्रुत्व,
रांगोळी,हस्तकला,यात आघाडीवर होते..वर्गात मॉनिटर ही होते..पहिला-दुसरा क्रमांकही मिळवला..माझ्या अभ्यासाचे ,बक्षिसांचे नातेवाईकांना,कॉलनीतल्या लोकांना,घरातल्यांना खूपच कौतुक होते..
लहानपणीच घरपोच पुस्तकांची लायब्ररी असल्यामुळे वाचन भरपूर झाले जे आज होऊ शकत नाही याचे फार वाईट वाटते..पुस्तके माणसाला चौफेर ज्ञान देतात..घडवतात..मी पुस्तकांना माझे गुरूच मानते..मी जे काही थोडं बहुत लिखाण करू शकते ते या पुस्तकांचीच कृपा.
.मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्यांदा तिथल्या मोकळ्या वातावरणाला संकोचले..नंतर मात्र रूळले..मला मुलं व मुली एकत्र पहाण्याची कधी सवयच नव्हती कारण माझं शिक्षण कन्या शाळेत झालेलं.पण नंतर कॉलेज जिवनातील ही मुक्तता तरीही अभ्यासातली शिस्त मला हविहवीशी वाटली..मी जरा मोकळी झाले. माझं वागणं बोलणं मुलिंमध्ये मोकळं असलं तरी मुलांशी मात्र दोन हात लांबच😜..मी रंगरूपाने बरी असल्याने कॉलेजमध्ये मुलं मागे लागणे हा प्रकारही मी अनुभवला..पण नंतर थट्टा मस्करीत मी त्या मुलांना दुर्लक्ष करत गेले..मी अर्थातच मुलांना भाव देणारी पोरगी नव्हते..😁त्यामुळे पोरगी पटत नाही तर दुसरी शोधा असा विचार करून पोरं दुसरीच्या मागे गेले😄 (आणि मी सुटले🤪)
मी सायन्स अर्थात विज्ञान शाखेची विद्यार्थिनी त्यामुळे अभ्यास खूप व मेहनतही..मी बारावी झाल्यावर त्याच सरस्वती भुवन महाविद्यालयात पुन्हा B.sc.computer साठी प्रवेश घेतला..मी प्राध्यापकांची लाडकी विद्यार्थीनी बनले कारण लेक्चर अटेन करणे,नोट्स काढणे,इतरांना मदत करणे या गोष्टींमुळे मी विद्यार्थीप्रिय व मैत्रीणींचीही आवडती झाले..मला कॉलेजमध्या दुसर्या वर्षी मिस एस.बी.ही स्पर्धा जिंकता आली. गायन,लेखण,परिक्षा,डिबेट अर्थात संवादातुन चर्चा,व्यक्तिगत मुलाखत या सर्व स्तरात सिलेक्ट होऊन लास्ट राउंडला जिंकले..मला माननीय गिरीशजी ओक या अभिनेत्याकडून बक्षिस व प्रमाणपत्र मिळाले..पुढे तिसर्या वर्षी मी कॉलेज कॅंपस इंटरव्ह्यु मधुन सिलेक्ट होऊन "स्टार माझा" (आताचे एबीपी माझा)या मराठी वाहिनीला जॉईन झाले, तेही मुंबईत..महालक्ष्मी रेसकोर्सरोडवर ऑफिस होतं..समुद्राच्या लाटा कॅफेटेरियातुन बघतांना स्वतःबद्दल फार अभिमान वाटायचा.मला सगळ्यांनीच खूप खूप शुभेच्छा दिल्या..मी ४ महिने जॉब केला...खूप शिकायला मिळालं..मी एव्हडा कमी कालावधीत तिथे राहिले ,पण सगळं जग जिंकल्यासारखं वाटलं.मुंबई आहेच तशी भुरळ पाडणारी..मायानगरी..लोकं तुफान काम करणारी. वक्तशीर,रांगा लावून प्रवेश घेणारी..कमालच सगळी..
मी मुंबईत प्रवेश घेतला तेंव्हा माझे बाबा माझ्यासोबत होते..आमचा अवतार साधाच मुंबईच्या त्या हायफाय लोकांमध्ये आमचे कपडे साधेच दिसत होते.,प्रवेशद्वारावरच गेटकिपरने अडवले..मी नाव सांगितले..appointment mail letterदाखवले..त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मलाच एन्ट्री दिली ..मी किंचित चिडले का यांनी माझ्या बाबांना बाहेर ठेवलं?मी रागातच आत प्रवेश केला..ते ऑफिस खूप मोठं व अतिशय आधुनिक होतं..मला क्षणभर संकोचल्यासारखं वाटलं..पण पुढच्याच क्षणाला मी सावरले..मनात विचार केला अरे यांनीच तर मला मेल पाठवून औरंगाबादहून बोलावून घेतलंय..मी का घाबरू..मी बेधडक रिसेप्शनिस्टला माझं नाव सांगितलं व माझ्या बाबांना आधि आत घ्या असं बजावलं...तिने आधि माझं लेटर पाहिलं मग बाबांना आत घेतलं गेलं..मला स्वतःविषयी वेगळाच आत्मविश्वास वाटला..त्या क्षणापासुनच तिथल्या वातावरणात मी समरसून गेले व पुढचा प्रवास अतिशय थक्क करणारा घडला...राजिव खांडेकर सर,मिलींद खांडेकर सर,चंद्रशेखर सर या त्रयींना मी कधिच विसरू शकत नाही...मी त्या अनमोल अनुभवांसाठी देवाची कायम ऋणी आहे..
नंतर आजारपणामुळे जॉब सोडावा लागला..खरोखरंच दुर्दैव ..पण ठिक आहे .मी स्वतःला सावरलं..बरेच दिवस लागले..नंतर औरंगाबादला एम एस्सी बायोटेक्नॉलॉजीला नंबर लागला..मी एक वर्ष केलं ..पण पुढे माझे आजोबा जाण्याचा जबर धक्का बसला..मी कोलमडले..परिक्षा अभ्यास जमला नाही मी फेल झाले..पण हार नाही मानली पुढे जॉब अनेक ठिकाणी केले..स्वावलंबी रहाणे मला नेहमीच आवडले...मग लग्न झाले..सुबोध कुलकर्णींशी विवाह जमुन आला.❤️(सुबोध २३ सप्टेंबरचा व मीही २३ सप्टेंबरची म्हणून दरवर्षी एकच केक कापत आलोय..😄वाढदिवसालाही व अॅनिवर्सरीलाही💞)तोही दिलदार व प्रेमळ स्वभावाचा मिळाला..सासू सासरे समजुतदार म्हणून माझ जॉब ते सहज स्विकारतात व माझ्या २ चिमण्यांना भरभरून प्रेम देतात..मी कृतकृत्य आहे.
त्यांचा व नातेवाईकांचा सपोर्ट तर फार उत्साहवर्धक आहे..मी जे नाव आज मिरवते ते या सार्या गोतावळ्यामुळेच आहे..प्रेमळ सासर व आदर्श माहेर म्हणून हा जिवनप्रवास सुरळीत चालूये..अर्थातच माझे सद्गुरू,राम व कृष्ण खरे शिल्पकार आहेत...मी एक मानव जो कृतार्थ आहे ईश्वराच्या या महानाट्याला,या खेळाला..
मी मनापासून आभारी आहे या माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणार्या माझ्या मैत्रीणिंना ज्यांच्या चिवचिवाटाने माझे मनरूपी झाड सदैव बहरलेलं असतं.
Thank you all Thank you शब्दसोहळा!!
Comments
Post a Comment