सद्सद्विवेकबुद्धी




✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी



    आपल्या रोजच्या आयुष्यात आपण किती गोष्टी या विवेकाला धरून करत असतो?खरं सांगायचं तर बर्याच !कारण जन्मतःच माणसाला ती देण आहे.सद्सद्विवेकबुद्धी!सहजच तिला किती महत्व आहे हे नित्याच्या आयुष्यात जरा डोकावून पहीलं.मी एक गृहिणी आहे ,माझं काम घरातल्या नित्याच्या कामांकडे लक्ष  तसेच त्या पार पाडण्याकडे ओढा असतो.सकाळचा चहा,नाश्ता,जेवणाची तयारी,देवपुजा किंवा स्तोत्र म्हणने,जप करणे,तसेच लहान मुलं आहे तर त्यांचं पहाणे,ज्येष्ठांची सेवा करणे,नवर्याची डब्याची तयारी करणे अशी कितीतरी कामांची यादी देता येईल.पण मंडळी ही कामं ज्या सद्सद्विवेकाच्या आधिन आहेत तो संपला तर?म्हणजे मी  दूध तापवलंच नाही कच्चच ठेवलं,चहा करायला गॅसवर ठेवला पण उकळलाच नाही,मुलांना आंघोळ घातली पण टॉवेलने पुसलंच नाही,घरातल्यांना जेवण दिलंच नाही म्हणजे जी कामं विवेकाला किंवा सारासार विचाराने चालतात त्या गोष्टी केल्याच  नाही तर घरी दारी काय गोंधळ होईल!.हाच प्रकार घरोघरी विद्यार्थी,शिक्षक,डॉक्टर,वकिल,अभियंता,समाजसेवक,नेता,मंत्री,खेळाडू वगैरे समाजतल्या प्रत्येक घटकाला लागू पडते.जर सद्सद्विवेकाचं भान सुटलं तर सगळीकडे अनागोंदी पसरेल.समाज व्यावस्था कोलमडून जाईल व मनुष्याचे जीणे कठिण होऊन बसेल.

   बघा ही आपल्या प्रपंचातली गोष्ट झाली.पण परमार्थात कसं वर्तन असावं?तर मंडळी समर्थ दासबोधात प्रत्येकवेळी आत्मानात्मविवेक करायला सांगतात.म्हणजे मी देह नसून आत्मा आहे.जर मी स्वतःला देह समजून वागलो तर विविध विकारांना भक्ष्य होईल.देहावर पंचमहाभूतांची सत्ता असते,सत्व -रज-तम हे तिन गुण त्याला जाळ्यात ओढतात.ही प्रकृती जी नाशवंत आहे व जी पुरूषाच्या आधिन आहे तेथे मी म्हणजे देह असे समजणे हा सारासारविचार नाही असं समर्थ सांगतात.वेदांनीही या मताला महत्वाचं मानलं आहे.४ महावाक्य तेच सांगतात.जर मी म्हणजे देह मानला तर प्रपंचात सांगितल्याप्रमाणे अनागोंदी माजते.मनुष्य प्रकृतीलाच सत्य मानून बसला की नाहक बळी जातो.परंतू खरा विचार हा आहे की मृत्यु झाल्यानंतर देह जाळून टाकतात परंतू त्याच्या आत वास करणारा तो आत्मा हा तटस्थ असतो.ही गोष्ट आजचे विज्ञानही मानते.मुळात देह जर मी ग्राह्य धरला तर माझा एखाद्या अपघातात पाय तुटला तरीही मी जिवंतच असतो ना?म्हणजे मी म्हणवतो तो मी म्हणजे पाय नाही .मी कोणीतरी वेगळा आहे.तो मी म्हणजे कोण हे समर्थ वेगवेगळ्या प्रकारे समजावतात. देहाचे वेगवेगळे तुकडे केले तरी त्या देहाला चालवणारा आत्मा हा सर्वसाक्षी ईश्वराचा अंश असल्याने साध्या डोळ्याने दिसत नसतो, तर सुक्ष्म दृष्टीने सिद्धाला दिसू शकतो हे समर्थांनी अनेक दाखले देउन समजावले आहे.जन्ममृत्यू हे देहाला लागू पडतात परंतू आत्मा परमेश्वराचा अंश असल्याने तो निर्गुण,निराकार,शाश्वत चिरंतन टिकणारा आहे.हीच आपल्या स्वरूपाची खरी ओळख!.मी म्हणजे तोच (परमात्मा)व तो म्हणजे मी हा अद्वैताचा गाभा आहे.माझ्यात व त्याच्यात मुळी भेदच नाही ही अनुभूती आल्यावर सर्व चराचर परमात्म्याचे वसतिस्थान आहे हे लक्षात येते.म्हणूनच परमार्थात व प्रपंचातही सारासारविचार फार महत्वाचा आहे.समर्थांना अभिप्रेत हाच विवेक आहे.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न