हॅलो सखींनो, कशा आहात? जागतिक महिला दिनाच्या सर्व मैत्रीणींना हार्दिक शुभेच्छा एक दिवस आधीच 😀... 

  आज मी विषय निवडलाय "बदलत्या जगातील  माझा मित्र - स्मार्टफोन! "

हा विषय ऐकल्यानंतर कितीतरी जणींना वाटलं असेल कित्ती खरंय आजच्या आधुनिक काळातील नवा मित्र म्हणजे माझा स्मार्टफोन.. 

   मैत्रीणींनो , आजच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक च्या जगात स्टेटस अपडेटेड रहाणं, लाईक, कमेंट नी ़शेअर करणं हे रोज चहा, कॉफी घेण्याइतपत कॉमन झालय, किती अजब गजब तरीही मनोरंजक दुनिया ही, प्रत्येकाला वेड लावते... मोबाईलच्या जगातील ही क्रांती सर्वसामान्य व्यक्तिलाही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवते. मोबाईलने आपल्या स्त्रीयांच्या विश्वात तर कमालच केलीये. ऑनलाईन शॉपिंग, डीपीवरचे सुंदर सुंदर फोटो, बदलणारे स्टेटस किती नी काय... मुळातच सुंदर असणाऱ्या माझ्या कित्येक मैत्रीणी आता स्वतः ला अधिक  अपडेट ठेवायला लागल्यायेत. बघून खूप मजा येते.. स्त्री ही मुळातच संसाराची आवड असणारी, कलाकार, कधी आई, कधी बहिण, कधी मुलगी कितीतरी नाती जपणारी...पण ही नाती सांभाळलतांना तिला तिचा स्पेस दिला या १ विताच्या स्मार्ट फोननेच.. तिचं विश्व समजून घ्यायचं झालं तर ही मोबाईल नावाची जादूगार नव्हे किमयागार वस्तू एकदा डोकावून पहावीच लागेल... काय नाहीये ह्या मोबाईल मध्ये? यादीच करायची झाली तर सकाळी लवकर उठवतं कोण? आलार्म अर्थात गजर...मोबाईल, सकाळी तिला सर्वांचे मेसेज, कमेंटस पहायला आजचे बर्थडे, गूड मॉर्निंग चे मेसेज... मोबाईल, त्यानंतर बर्याच मैत्रीणी सकाळची कामं करता करता अगदी मीही भूपाळ्या, भक्तीगीते, जुनी गाणी ऐकत असते, दिवस कसा मस्त जातो, जणू सगळ्या दिवसाचं बूस्ट मिळतं... हे सगळं कोण करतं मोबाईल, तूम्ही नोकरी करत असाल तर मोबाईल शिवाय पर्यायच नाही नी घरी असाल तरी घरकामातही पूढे येतो तो मोबाईल... कितीतरी रिमांईंडर्स तुम्हाला रोजच्या कामात मदत करतात... तुमच्या कामाचं व्यवस्थापन वेळेत करून देतो तो मोबाईल... अर्थात को़ण कसा हा मोबाईल वापरेल तसा त्याला त्याचा अनुभव... जगातल्या कुठल्याही गोष्टीचं असंच असतं चांगली वस्तू वापरली तर ती चांगला फायदा देते... खरंच मोबाईल ला आता वस्तू म्हणनंही चुकीचच ठरेल इतका तो मानसाळलाय... मैत्रीणींनो तुम्हालाही हे पटेल... कितीतरी आनंदाचे प्रसंग आज सोशल मिडीयावर व्यक्त होतात... अगदी लग्नासहित....कोरोना काळात तर लक्षणीयरित्या मोबाईल आपली गरज बनली.. अगदी जीवनावश्यक ..वर्क फ्रॉम होम असो की ऑनलाईन मिटींग, मुलांचे ऑनलाईन शिक्षण असो की स्त्रीयांचे रोजचे संवाद सगळं या  स्मार्टफोन नावाच्या मित्राने लिलया पेललं... गुगल पे, फोन पे नी रिचार्ज करणंही सोपं झालं.. सगळं घरबसल्या... कितीतरी गृहीणींनी अनेक व्यावसायही ह्या स्मार्ट फोनवर सुरू केलेत... एक ना अनेक या फोनने मला माझ्या सारख्या कित्येकांना नविन उर्जा, उमेद दिली.. कोणा़शीही संपर्क करता येण्यामुळे अनेक कामं सोपी झाली... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळं जगच यामूळे स्मार्ट झालय... नविन जगात नवा मंत्र रहा स्मार्ट, दिसा स्मार्ट...


   एक सेल्फी मी व माझा स्मार्ट फोन आजच्या युगाचं चित्र... पण या स्मार्टफोनमध्ये आख्ख जग रहातं हे विसरू नका... 😉



😄😄🥰🥰😊😊😊


सौ. स्वरूपा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न