माझे माहेर अक्कलकोट

 

   ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी

 

    कोरोना व लॉकडाऊन झाल्यानंतर मला ओढ लागलिये माझ्या माहेरी जाण्याची... तसं माझे माहेर औरंगाबाद परंतु, कोरोनाच्या या संकटकाळात निर्विघ्नपणे बाहेर काढणारे माझे गुरू श्री स्वामी महाराज यांना भेटण्याची ओढ तीव्र आहे... त्यांचं बोलावणं आलं की दर्शन नक्की होणार हा विश्वास आहेच... त्यामुळे या संकटकाळाचे खरे रक्षक तेच व माझे आप्त, स्वकियही तेच... म्हणायला सद्ध्या मी घरात आहे परंतु अक्कलकोट ला जाण्याची ओढ जणू 'जल बिन मछली जैसी' अशी आहे.. काय सांगणार नी किती सांगणार अक्कलकोट हे गुरू भक्तांसाठी काय आहे? ते एक तिर्थक्षेत्र तर आहेच पण माझी स्वामी माऊली जेथे वास्तव्यास होती त्या जागेची त्या स्थानाची महती काय वर्णावी? साक्षात दत्त महाराज तेथे वास्तव्यास होते... निर्गुण निराकार परंतु भक्तांसाठी सगुण साकार झालेले हे तेजस्वी रूप पहाण्यासाठी देवी देवताही खाली येतात.. अक्कलकोट हे स्वामींचे स्वामीभक्तांचे पंढरपूर.. इथे विठूराया आमचा स्वामी महाराज तर संत म्हणजे चोळप्पा, बाळप्पा, स्वामीसुत ही स्वामींची श्रेष्ठ भक्त मंडळी... 

      गुरूरब्रम्हा गुरूरविष्णु गुरूर्देवो महेश्वरः। 

गुरूर्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः।।

       गुरू हेच सनातन ब्रम्ह, तोच पालन पोषण कर्ता विष्णू व तोच संहार कर्ता महादेव!! हे आज कोरोनाकाळात आपण जवळून अनुभवतोय... जन्माला घालणारा तोच, पालन पोषण करून सांभाळणारा तोच व संहार करणाराही तोच.. 

." भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे"  हे ब्रम्हवाक्य आशिर्वाद रूपाने सोबत असतांना भ्यायचं कशाला? तोच  कर्ता धर्ता असतांना  दुश्चित्त का व्हायचं... जो सदासर्वकाळ भक्तरक्षणासाठी उभा आहे तो स्वामी सर्व विश्वाला तारण्यासाठी समर्थ आहे... हवाये तो पूर्ण विश्वास, अढळ निष्ठा.. 

      गुरू कोणत्याही परिस्थितीत भक्ताला एकटं सोडत नाहीत, हा अंतरी भरवसा ठेवूनच मी समर्थांना कळवळून प्रार्थना करते की, हे स्वामीराजा, तू तारक तू मारक ,मी पतित तू पावन, लेकराला पोटाशी घे व हे तांडव संपव..मी शरण आहे माझा प्रतिपाळ कर कारण भक्तवत्सल हे तुझे ब्रीद आहे... त्राही त्राही गुरूदेव, पाही माम् पाही माम् पाही माम् "

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न