मैत्री👩


  आपल्या लहानपणी शाळेत जाण्याचा पहिला दिवस आठवा... 😁😁... जवळ जवळ सगळ्यांनीच रडत रडत काढलेला दिवस... 'आई तू बस नं माझ्याजवळ' म्हणून केलेला हट्ट... आता आठवलं तरी हसू येतं पण तेंव्हा ते केव्हडं भलं मोठं संकट वाटलं .. आईपासून दूर या रंगीबेरंगी, अनोळखी दुनियेत कसं रहायला शिकायचं याचं दडपण प्रत्येकाला होतं... असे दुःखाचे दिवस काढतांना😄😄एक दिवस कोणीतरी स्वतः हून आपली ओळख सांगतं, कोणीतरी आपल्यासारखंच या रंगीत दुनियेत मार्ग शोधत असतं... आपल्याला भलतंच भावतं(कारण, एव्हड्या अनोळखी किलबिलाटात स्वतः हून पुढे आलेला तो हात मग घट्ट मैत्रीचा होतो) ती आपली पहिली मैत्री कट्टी दोस्तीची, खाऊ खाण्याची, लपाछपी खेळण्याची तशी गरजेनी निर्माण झालेली तरीही हवीहवीश, आश्वासक.....आई जवळ नसली तरी मन रमवणारी... शाळेत येण्याची ओढ जपणारी... (नाहीतर खरं सांगा, दोस्त नसते तर शाळेत कुणी पाऊल तरी ठेवलं असतं का😃) असेहे फुलपाखरू वय मग आजुबाजूचा अंदाजा घेत मोठं होतरहातं, आपल्या आवडी निवडी, परिस्थिती, अभ्यास यानुसार आसपासची मंडळी बदलत रहातात, पण मैत्री मात्र थोड्याच जणांशी किंवा जणींशी होते... आपल्या विश्वात जेंव्हा पहिली सखी येते तेंव्हा ती भातुकली खेळते, खाऊसाठी भांडते, रडते, कट्टी दोस्ती करते पुढे ज्या येतात त्या काही अभ्यासात हुशार किंवा ढ म्हणाव्यात अशा नाही पण सोसोच😄 अशा.. कामापुरता अभ्यास करणार्या, असा ग्रूप वेगळा, अभ्यासू ग्रूप वेगळा पण मैत्री म्हटलं की सगळं सारखच असतं, प्रेमाने केलेली मारामारी असो की हसवून हसवून पोटात आणलेली कळ असो, रात्री जागून केलेला अभ्यास असो की परिक्षेपुर्वीचे टेन्शन असो,आपण रडतांना केलेला जोक असो की हसता हसता रडवणे असो मैत्री ची झिंग त्या त्या वयात वेगळीच ...ग्रूपमधे खोखो हसतांना कॉलेजमधली मजा कशा कशालाच नाही... ते विश्व वर्णन करायचं झालं तर मोठा ग्रंथ तयार होईल.... मनापासून मैत्री जगणारे सर्वसामान्य आयुष्यात नक्कीच सोशल असतात... गमतीदार क्षणांना तसेच हसत प्रतिसाद देतात नी मित्रासाठी रडतांना नजर चुकवून अश्रू गाळतात... शेवटी मैत्री करतो म्हणजे काय करतो आपण सख्खी नातीच बनवतो नं माणसांची, मग काय रक्ताच्या नात्यापेक्षा  ह्रदयाने जोडलेली ही नाती आयुष्य जगायला एनर्जी देतात, उमेद देतात. खचलेल्या प्रसंगात तर नातेवाईक लांब रहातात पण हीच मैत्री पुढे येऊन आपल्याला सावरते... जणू परमेश्वराचाच हात असतो हातात... खरंच जर आपण मैत्रीने श्रीमंत असू तर बाकी कसल्याच गोष्टी ची कमतरता नसते.मित्र कायम जवळ असेल तर वेळ कधी जातो हे कळत नाही म्हणून मैत्रीची साथ असेल तर आयुष्य विविधरंगी, हलकंफुलकं, जास्त रंगतदार, खूप बेफिकीर जातं... 

    मैत्री तुझी नी माझी बदलवते दुनिया सारी हेच खरं... सलाम त्या सार्यांना ज्यांनी मैत्री नेहमी प्राणापलिकडे जपली व वाढवली.... 🙏


 लेखिका- सौ. स्वरूपा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न