☀️    श्री राम    ☀️


  आपल्या हिंदू धर्मात राम आणि कृष्ण ही मुख्य २ दैवतं इतर देवतांपेक्षा खूप वेगळे आहेत. सर्वगुणसंपन्न अशी त्यांची ओळख आपल्याला आहे.मनुष्यावतार म्हणूनही व देवता म्हणूनही ते कायमच शूरवीर, बुद्धिमान, अष्टावधानी, चतुर असेच आहेत.त्यात श्री रामाची ओळख आपलं आवडतं दैवत अशीच होते. कृष्णही आवडताच पण राम मनुष्याच्या आदर्शांना जपणारा म्हणून प्रिय..

      निळं सावळं रूप, कमळासारखे नेत्र, कटीवर पितांबर धारण केलेला, गालावर रक्तिमा पसरलेला नी सस्मित वदनाचा राम पाहीला की खर्या भक्ताचे लोचन पाणावतात... भक्तांसाठी कायम अभय असलेला, सकलगुणमंडीत श्री राम सतत ध्यावा, गावा, पहावा, आठवावा,  त्याचा कधीही विसर न पडावा हीच  तळमळ भक्ताच्या ह्रदयी असाते...रामाची कथा वाचल्यानंतर त्याने मानलेली उच्च जीवनमूल्ये आपण सर्वांनी स्वताःत आणन्याचा प्रयत्न करावा...त्याने केलेला असिम त्याग, गुरूजनांची सेवा, बंधूप्रेम, पत्नीशी एकनिष्ठता, सेवकासाठीचे प्रेम हे सगळं आदर्शच. एका महान तपस्वी राजाची घनघोर संघर्षाची कहाणी जी रामायण म्हणून प्रसिद्ध आहे ती केवळ वंदनियच...सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान सगळेच श्रेष्ठ कलाकार ज्यांनी रामायणाचे नाट्य रंगवले, परंतू या सर्वांचा आत्मा हा रामच आहे हे कोणीही सांगू शकेल... त्याच्याभोवतीच ही कथा आकार घेते व पूर्णही होते. 



रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।

 रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः।

    धन्य धन्य श्री राम धन्य ती जानकी...

 ।।सियावर रामचंद्र की जय।।


-स्वरूपा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न