🌷🌸🌺राम🌺🌸🌷

भेटी लागी जिवा, लागलिसे आस। 


    मानवाच्या जन्माला जेव्हा आपण येतो तेव्हा जग आपल्याला सर्वस्वी अनोळखी असतं. पण हळूहळू सहवासाने हे जग आपलं वाटायला लागतं. आपली आई आपले वडील ही ओळख आपल्याला होते. आजुबाजूचे वातावरण आपलेसे होते. पण आपण कोण कोठून आलो  कूठे चाललोय याची उत्तरे आपल्याकडे नसतात. आयुष्य आहे म्हणून ते जगायचं याला तसा काहीच अर्थ नाही. मी कोण, कोठून आलो कुठे जायचय ही उत्तरे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत या पृथ्वीवर येण्याचं कारण कळणार नाही. यासाठीच एक सच्चा मार्गदर्शक आपल्यासोबत असणे गरजेचे असते. त्यालाच सद्गुरु म्हणतात. जो हा अनोळखी भवसागर तरून जाण्यासाठी उत्तम नावाडी असतो. थोड्या विचारांती कळेल की सद्गुरु आपल्याला कुठे घेऊन जाणार? तर तो त्या परब्रह्म परमेश्वराकडे नेणार. जे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. अध्यात्माचा हा मूळ गाभा आहे की जेथे जीव शिव मिलन होते तेच आपले खरे घर तेच ते परमधाम. 

    त्या रामाला, सतचिदानंद परमेश्वराला भेटायचे झाल्यास भक्ती ह्रदयात असणे, ही पहिली अट... कारण खर्या तहानेशिवाय पाणी मिळून उपयोग नसतो. यासाठी चातक व्हावं.परमेश्वराकडे जाण्यासाठी आधि ती ओढ ती तळमळ, तो स्वतःचा शोध घ्यायची लालसा हे सारं आवश्यक आहे. तो आत्माराम गवसणे दुर्मिळ आहे पण अशक्य नाही. तो हनुमंताचा झाला, अर्जुनाचा झाला, इतर अनेक संतांचा झाला मग आपला का होणार नाही ही आश्वासक बाजू विचारात घेतली जावी. 

      मी एक दिवस त्या रामाची होईल किंवा त्या कान्हाची होईल यासाठी मी का मागे रहावं. तो जर परमेश्वर मला एव्हडं सुंदर आयुष्य देतोय तर त्याचं होणं हा किती मोठा नी किती सुंदर अनुभव असेल, हो की नाही? 

त्याच्या प्रेमापोटी भक्ती खातर का नाही मी सतत प्रयत्नशील रहावं? तो केवळ प्रेमाचा भुकेला, भक्तित तो उष्टी बोरं, ज्वारीच्या कन्याही आनंदाने ग्रहन करतो तर का माझ्या मनीचे हितगुज तो जाणनार नाही. का मला स्वतःत सामावून घेणार नाही. ते त्याला भेटलेले संत महमत असतील पण मी कोणीच नाही का? मीही त्याचाच एक अंश ना? मग मनाशी चंगच बांधावा या मोहमयी जगात माझा विठ्ठल माझ्यापासून दूर राहू नये. सतत सोबत रहावा. विठू नेईल पल्याड हा विश्वास  अंतरी ठसावा. तोच कर्ता तोच धर्ता. मी त्याच्याहून वेगळा तरी त्याचेच अंग. त्याचे मा़झे अद्वैत मला गवसो नी हा प्रवास यशस्वी होवो हीच सद्गुरु आई चरणी प्रार्थना🙏🏻


   ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न