पाऊस ... 



✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी




 बरसत ये सखया माझ्या उरात ह्या, 

दे चिंब जाणिव तृप्तीची मनास या.. 


दे चिंब शहारे वृक्षवेलिस या, दे आतुर ओढ चातकास या.. 


दे मृदगंध स्वर्गिचा श्वासास या, 

मी क्षण क्षण विसरले जगास या.. 


दाह प्रीतीचा विझवू दे विरहणीस या, 

मी भूलले तन मन धन तव स्पर्शात या... 


विपूल शतधारांची तव मूर्त मनोहारी, 

दे अवचित मयुरभेट दृष्टीस या... 


फुलले क्षण, भुलले मन, 

तरीही निशःब्द तू प्रितीत या...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न