माझे पहिले प्रेम
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
पहिल्या पहिल्या पावसात,
पहिलं वहिलं प्रेम,
वेड लागले भररस्त्यात,
ते मस्त उनाड भाबडे...
रस्ता वाटे नवानवा,
जरी ओळख ही जुनी,
मुक्त वाटे नदी नाला,
भरती तिला ही प्रेमाची...
प्रितीचा हा अजब सोहळा,
दिशा गाई गीत नवे,
पुलकित हे इंद्रधनू साजिरे,
शब्दही तिष्ठती पुढे...
मातीचा गंध पोहोचवी,
सळसळणारा प्रिय वारा,
अजोड,अबोल ही प्रित ह्रदयाची,
कळे भाबडी तरी अव्यक्ताची...
टाकूनी कामधाम प्रिया तू,
ये लवकर मज भेटीला,
तुजवीण भासे स्वर्ग सुना हा, पहिला श्रावण वसुधेचा...
रिक्त करी ती प्रित तुझी अन्
मज बोलाया न शब्द उरे,
तुझे माझे भावविश्वच अधुरे,
परस्परांच्या स्नेहाविण ते..
प्रित उमले पावसात ही,
नसे तमा तीज कोणाची,
तो बावरा ती बावरी,
तहानलेली परी सुखावलेली....
मनमुक्त बरसतो हा पाऊस,
कोसळतो सहस्रधारांनी,
मीही चिंब तूही चिंब,
न जागा उरे व्यक्त होण्याची..
Comments
Post a Comment