द लॉकडाऊन ईफेक्ट... 



मी  व स्वयंपाकघर... 



✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी


स्वयंपाकघर म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील लग्नानंतरचं तिचं पहिलंवहिलं व्यासपीठ..हक्काचं..कारण ती व तिने बनवलेले पदार्थ हे सगळ्या घराला नव्हे नव्हे सगळ्या नातेवाईकांनाच कुतूहलाचा विषय ठरतात...स्त्रीला स्वतः ला सिद्ध करण्याची ती एक अत्यंत जिव्हाळ्याची जागा आहे...गृहीणी असो की नोकरी करणारी स्त्री दोघीही स्वतः बनवलेल्या स्वयंपाकाला जास्त महत्त्व देतात...कारण तिने त्यात स्वतः चा प्राण ओतलेला असतो...मग त्या पदार्थाची चव खाणार्यातच्या जिभेचा ठाव घेते...सुरूवात जरी या क्षेत्रात अडखळत झाली तरी पुढे मात्र "मला माझ्या बायकोने केलेला ढोकळाच आवडतो" किंवा "आईने केलेल्या उसळीची चव कशालाच नाही" ही मुलांची वाक्य तिला सुखावून जातात...

     पहिलं लॉकडाऊन म्हटलं तर कठिण नी म्हटलं तर गमतिदार होतं...स्त्रीयांसाठी स्वयंपाकघर व त्यांचा जिवश्च कंठश्च  मोबाईल जरा जास्तच जवळ आले. कारण काय तर सुगरणींना नविन रेसिपींना लाईक्स किती मिळाले व मी स्टेटसवर कशी झळकले हे मिरवण्याचे ते दिवस होते.. त्यात आईला मोकळा वेळ मिळनं कठिण झाल्याने मुलंही वैतागलीच पण काय करणार आ़ईचे हे नवे वेड थांबवणे कठिणच होते😄आता नवरोजी खायला प्यायला व ल्यायला जागेवर मिळत असल्यामुळे तसे वरवर शांतच.😄😄.. (मनात मात्र हीचा मोबाईल कुठल्या कचराकुंडीत फेकू😂) असा प्रश्न मनातल्या मनातच ठेवून 'वाह, आज काय नविन रेसिपी वाटतं? 'असे अत्यंत (केविलवाणे) प्रश्न चेहर्यावर शक्य तेव्हडा आनंद ठेवून विचारत होते... 

   मी ,मुली व नवरोजी यांच्या केविलवाण्या प्रश्नांना सुरवातीला जपत होते, परंतू या लॉकडाऊन इफेक्टने मा़झ्यावरही गारूड केलं...दिवसेंदिवस नवरा, मुली यांचं बेशिस्त वागणं वा़ढलेलं बघून मग मीच का म्हणून असा एल्गार केला.. मीही ठरवलं आपली स्पेस जपायची... रोज उशीरा उ़ठायचं, आरामात चहा, टीव्ही, मोबाईल, मग जमल्यास झा़डू केर, नाश्ता जमला तर जमला नाही तर नविन रेसिपी करून डायरेक्ट जेवणचं... 😄.. .सकाळ ते रात्र यातिल वेळ नविन कथा, कविता लिखाण, व्हिडिओ तयार करणे (तेपण नटून थटून), कोण काय म्हणतंय ते विचार करणं सोडून देणं असा कार्यक्रम काही दिवस राबवला, परंतू यावर घरातील वातावरणात काहीच बदल नाही हे पाहून पुनः पिछे मूड चा नारा लावत मी आपली जबाबदार, कर्तव्यदक्ष गृहीणी झाले... 😁 मी घरच्यांच्या आळसाला सलाम करत परत नित्याच्या कामाला जुंपले... पण एक गोष्ट यातून मिळाली, ती म्हणजे रोज नविन  मराठी, हिंदी गाणी 🎧ऐकू लागले तेही काम करता करता...माझ्यातली रसिकता जपून जूनी, शास्त्रीय गाणी ऐकली...एकीकडे स्वयंपाक तर दुसरीकडे संगित मस्त कॉम्बिनेशन जमलं... जु़ळून आलं... मग काय कामाला स्फुर्ती आली... नविन नविन स्टेटस दिसू लागले, शेअरींगला उधान आलं... फेसबुक व्हॉट्सअॅप ने साथ दिली व  काय सांगू मैत्रीणींनो मी लोकलची ग्लोबल झाले...😄

      स्वयंपाकघर मला आता नविन नविन रेसिपीजसाठी खुणावतंय... मला एक नवी संधी द्यायला स्वतःला सिद्ध करायला...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न