स्त्री... 



✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी




       मी स्वतःला एक स्त्रीवादी लेखिका आहे असं काही मानत नाही कारण पुरूषही त्याच्याजागी काहीवेळा बरोबर असतो. ते मान्य करायलाच हवं. खरं म्हणजे स्त्री व पुरुष एका नाण्याच्या दोन बाजू. स्त्री एक परिपूर्ण व्यक्ती आहेच हा माझा ठाम विश्वास आहे परंतू समाजात वावरतांना स्त्री पुरूषाच्या कवचातच सुरक्षित होते. तो अन् ती खूप वेळा एकमेकांच्या परस्पर स्नेहासाठी आसुसलेले असतात. ते नैसर्गिक आहे .शारीरिक दृष्ट्या पुरूष व स्त्री यात भेद आहेत, तसेच स्त्री मनाची घडणही वेगळीच असते हेही खरे. समाजात स्त्री लहानपणापासून वेगळी घडत जाते. तीच्यावर होणारे संस्कार वेगळे असतात. ती स्त्री आहे म्हणजे कमी आहे असा ग्रह समाजात होत असतो परंतू तसे नसून पुरुषापेक्षा वेगळ्या नैसर्गिक प्रक्रियांसाठी तिची निवड झालीये म्हणून ती शारीरिकदृष्ट्या नाजूक तरीही सहनशील असते.डिलिव्हरीच्या कळा सोसणारी ती किती सहनशील आहे हे सांगायलाच नको. निसर्गाने तिला आई बनवलं, ही बहुमुल्य देणगी दिली. त्याचं कारणंच ती हळूवारपणे, कोमल स्पर्शाने बाळाचे लालनपालन करू शकेल. ती हे करतांना वत्सल भावनेने बाळाची पूर्ण  काळजी घेते. तीला जन्मतःच  वत्सलतेचे वरदान लाभलेले असते. बाळाचे कोडकौतुक करतांना ती स्वतः ला विसरून जाते. तिचं लग्न, डिलिव्हरी, पालकत्व,सासू होणं, आजी होणं या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ती कणखर बनत जाते. अनुभवसंपन्न होत जाते. जीवनकालात ती किती स्थित्यंतरं अनुभवते. काही स्त्रीया सौभाग्य हरवतात पण हिमतीने संघर्ष करून ताठ मानेने जगतात. काही स्त्रीयांना मातृत्व लाभत नाही पण तरीही इतर कामांत व्यस्त राहून मन गुंतवतात. आजची स्त्री तर घर सांभाळून करीअर सांभाळते. तीची धावपळ, कष्ट, सगळं घरच्यांनी समजून घेतलं तर तीला हत्तीचं बळ मिळतं. तिला गरज असते फक्त कौतुकाची, तिच्यासोबत असण्याची. 

        असं म्हणतात स्त्री ही क्षणभराची प्रेयसी व अनंत काळची माता आहे. विचार केला तर जाणवेल हे किती मोठं सत्य आहे. ती घराचा उंबरा ओलांडून आत येते नी सगळं घर आपलंसं करते. तिच्यातील खर सौंदर्य इथे खूलते. ती बायको म्हणून, सून म्हणून, पूढे आई म्हणून वात्सल्याने घराला सांभाळते. तिच्याशिवाय नवरा नेहमीच अधुरा असतो. तिच्या अस्तित्वाने त्याचे जगणे सोने होते. रथाची ही दोन चाकं परस्पर प्रेमाने, सौहार्दाने जीवनवृक्ष बहरत ठेवतात. स्त्रीच्या ठायी असलेली उपजत समजूतदारपणाची, सहनशील असण्याची वृत्ती घराला प्रगतीकडे नेते. पुरूष जेव्हडा तिला समजून घेईल तेव्हडं ती त्याच्याशी समर्पीत होत जाते. तीचा समर्पणाचा वसा लग्न लागल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत कायमच रहातो. ती निसर्गताच शक्तीचं एक स्वरूप आहे. प्रत्यक्ष परमेश्वरच शक्तीशिवाय ब्रह्मांडाची निर्मिती करूच शकत नाही. तिचं अस्तित्व ही निर्मात्याची सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे. ती आहे म्हणून जग आहे, तिच्याविणा देवही एकटा आहे. म्हणूनच  तिच्यातल्या ईश्वरी शक्तीला प्रणाम असो. ती रणरागिणी, दुर्गा, वत्सला, आदिशक्ती  आहे तिच्या प्रत्येक स्वरूपाला नमस्कार असो🙏🏻ती  प्रत्येक स्त्री स्वतःची खरी ओळख समजून घेवो हीच मनापासून सदिच्छा...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न