#कोजागिरी


-सौ. स्वरूपा कुलकर्णी


      आकाशीच्या चंद्र चांदण्यांचा खेळ रोज रंगतो. रोजची रात्र विविध गमती जमतींनी भरलेली असतेच. पौर्णिमेला चंद्र पूर्ण तर अमावास्येला गायब अशा लपाछपीचा खेळ होतच असतो. चांदण्या आपल्या नित्य चमचमणाऱ्या झग्यात लुकलुकत असतात. संध्याराणीच्या परसात रजनी येते नी दोघी एकमेकींना इतक्या कडकडून बिलगतात की संध्या रजनीतच एकरूप होते.अशी ही रजनी रोज आपल्या आकाशाच्या प्रांगणात रममाण होते.

     पण मंडळी, कोजागिरीची रात्र मात्र वर्षभरातील सर्व रात्रींहुन निराळी. कारण ह्या रात्री रजनी आपल्या पूर्ण श्रृंगारात प्रियकराच्या स्मरणात मुग्ध होत असते. तो प्रियकर म्हणजे अर्थातच चंद्रदेव.. आकाशातल्या भव्य पोकळीत रजनीच्या संगे आपल्या पूर्ण कलांनी विकसित झालेला चंद्र असंख्य ताऱ्यांशी रासक्रीडा करत असतो.

   कोजगिरी किंवा शरद पौर्णिमा म्हंटलं की कृष्णाने राधा- गोपिकांशी खेळलेला महारास आपण कोणीच विसरू शकत नाही. कृष्णं म्हणजे तो १६ कलांनी विकसित चंद्र तर चांदण्या म्हणजे राधा व गोपिका. हा महारास रात्रभर रंगतो.चंद्रकिरणांचे अमृतपान सगळेच करतात व आकाश व धरती त्या सुंदर महारासाचा एक भाग बनतात. 

      कोजागिरी म्हणजे लक्ष्मीच्या धरतीवर आगमनाची रात्र! कोण जागं आहे? असं विचारत लक्ष्मी धरतीवरील सर्व मानव जातीला ही रात्र जागुन काढायला सांगते. कारण ह्या रात्री चंद्रकिरणांसवे आकंठ दुग्धपान, देवाचे भजन, किर्तन विविध धार्मिक कार्यक्रम यांनी सर्व मानवी समाजाची अध्यात्मिक प्रगती साधते.

   तर मंडळी, तुम्हीही साजरी करताय ना? कोजागिरी😊🌸

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न