ऋतु पावसाळी

©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी



रिमझिम पावसाच्या झिम्माड सरी येती,

आसावली रे धरा चिंब भिजते सारखी


रंग बदलती ढगांचे रंग काळानिळा होई,

मधुुनच विजा चमकून खाली येती


वारा कुंदं मंदं धुंदं पक्षी कोटरात गेली,

मातीच्या सुगंधाने दिशा दरवळल्या दाही


येतो पाऊस घेऊन नवी आशा नवी उर्मी,

माझ्या शेतात अंकुरती बीजं सोनेरी पोपटी


उद्या पिकेल शेतात बीज नवे सोनियाचे,

मी वेचिन क्षण सुखाचे आनंदाचे भरलेले

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न