वाढदिवस
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
आज तिथीनुसार माझा वाढदिवस. आज चाळीसाव्या वर्षात पदार्पणहोत आहे. आज विचार करतांना सहज मागे वळून पहीले, खरंच किती सुख- दुःखाचे सोहळे अनुभवले. म्हंटलं तर आजवरचे आयुष्य सहज सुंदर होते. काही अपवादात्मक कटू प्रसंग सोडले तर माझ्या वृत्तीत सद्गुरूकृपेने समाधानी आयुष्य लाभले. रामाशी व कृष्णाशी सख्य करता आले हे या आयुष्यातले पारमार्थिक फळ! तीच माझी जीवनभरची सार्थकता!
जगणं समृद्धं करणारे अनेक सुरेख प्रसंग लाभले. माझे बालपण, प्रेमळ, सात्विक आई- बाबा, आजोबा, त्यांचे संस्कार, माझे शालेय आयुष्य,अनेक बक्षिसं , प्रमाणपत्रं, मैत्रिणी, सर्वात महत्वाचे शिक्षक, कॉलेजजीवन, तिथले प्राध्यापक, पहिला जॉब, तोपण मुंबईतला, नंतरचे कडू गोड अनुभव, लग्नं, नवरा, सासर, घर वितक घेणे,पहिलं अपत्य मुलगी, ओवीच्या येण्याने लाभलेली कृतार्थता, नंतर तिन वर्षांनी आर्याचा जन्म, त्यांचं बालपण, शाळा , माझे लिखाण, बक्षिसं, प्रमाणपत्रं, लोकसंग्रह, आध्यात्मिक प्रगती( अनुभवी व ज्येष्ठांमुळे लाभलेली), किती गोष्टी सांगाव्यात..एकुणच जगण्याचं मर्म आता उमजू लागलंय अशी परिपक्व अवस्था येत चाललीये. जगणं प्रगल्भ होत चाललंय. लहानपणीची अल्लड निरागसता अजुनही जपुन आहेच पण वैचारीक प्रगल्भताही हळूहळू साध्य होतिये. जगण्याकडून अपेक्षा होती ते बरंच मिळालंय व जे बाकी आहे तेही मिळेलंच हा आत्मविश्वास आहे.
या सुंदर प्रवासात जेव्हडी माणसं लाभली ती सोन्यासारखी होती. स्पेशली देव,सद्गुरू,आई, बाबा व आजोबा, यांना मनःपुर्वक वंदन! ते होते व आहेत म्हणूनच ही नैय्या भवसमुद्र पार करणार. हा अंतरंगातला ठाम विश्वास व श्रद्धा आहे.इतर जे स्नेही, शिक्षक, मैत्रिणी, ओळखीचे लाभले तेही ९० टक्के चांगलेच लाभले. त्यांच्या शुभेच्छा व आशिर्वादामुळे माझं पहिलं पुस्तकही प्रकाशित झालं. अत्यंत दुर्मिळ असा घरच्यांचा व बाहेरच्यांचा सपोर्ट लाभला. मी कृतार्थ व धन्य आहे.
माझ्या बकेट लिस्टमध्ये अजुन बऱ्याच गोष्टी करणे बाकी आहे. भारतातल्या धार्मिक स्थळांचा प्रवास, स्पेशली अयोध्या, काशी, द्वारका,गोकुळ तसेच परदेशातला प्रवास, सुंदर ठिकाणी मोठे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा मानस आहे, नवनविन गोष्टी शिकण्याचा व शिकत रहाण्याची इच्छा आहे, नवरा व मुलींना कायम चांगली साथ व प्रेम देत रहाण्याची मनिषा आहे, त्यांच्यामुळे कायमच मी प्रगती करत राहिले व आयुष्य भरभरून जगत राहिले अशीच त्यांची मोलाची साथ राहो ही देवाला प्रार्थना करते.
खरं म्हणजे चाळीशीत पदार्पण केल्यामुळे झालेले हे सिंहावलोकन..बापरे आयुष्य अर्धं जगलोय 😳किंवा आता तर कुठे सुरूवात आहे😍, अभी मंझील बाकी है असा संमिश्र भाव मनात आहे.
शेवटी किती जगलो पेक्षा कसे जगलो हे जास्तं महत्वाचं नाही का? तर मंडळी, तुमच्या शुभेच्छांमुळेच माझ्या आयुष्यात नवक्षितिजाची पहाट झाली असं मी मानते. ते शुभाशीष कायम राहो. ईश्वर व सद्गुरू कायम पाठिशी राहोत हीच प्रार्थना🙏🌸
Comments
Post a Comment