#अक्षरधनकाव्यस्पर्धा
कवितेचा विषय- श्रावण
शिर्षक- श्रावणधारा
घन निळे श्रावणातले
भाव गहिरे सांजओेले
कुठून येते ही अवचितं
झुळूक मृदगंधी हलके...
पश्चिमेत मेघांची दाटीवाटी
रंगली मधुनच केशर-पिवळी
रवी हरपला सांजडोही
निशा हलकेच चाहूल देई...
रंग गंधांचा मेळ सुगंधी
हवेत अवघा दाटून जाई
गार वारा मधुनच आता
सांज कलंडते ठायी ठायी.....
आस्मानीचा द्याया निरोप
वीजबाई लखलखली न्यारी
दिशा धुंद त्या; वाराही मंद
आसुसलेली ही धरा सारी...
कडकडती वीजा मेघही सज्ज
वर्षाव अमृताचा होई प्रचंडं
चातक आतुर तृषा भागवी
सारी सृष्टी भिजली निवली..
अविरत गाती श्रावणधारा
गीत धरतीचे मांगल्याचे
नववधू ही जणू नहाते
मुक्त बावरी आनंदाने.....
कवयित्रीचे नाव- सौ. स्वरूपा कुलकर्णी
ठिकाण- राहाता, जि.अहमदनगर
Comments
Post a Comment