पावसातले प्रेम

©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी


तू पावसाळी गीत गाशी

मी धुंद तव आठवांशी

घट्ट लपेटून तूला घेते

प्रेमगीत मज ओठी...


स्पर्श तुझा चिंब ओला

मनी मानसी चिंब ओली

कधी भेटशील सजणा

मी प्रिया तुझी स्पर्शवेडी..


होई सांजं धुंद मस्तं

मी व्याकूळ तुला शोधी

तू गेला निघून दूरदेशी

माझी राहिली जुनी गाणी


तूझ्या स्पर्शास आतुरं

मी भाबडी रे हरिणी

तुला शोधते पावसांत

कधी लपेटून घेशी..


माझा राजा तू भोळा

मी राणी तुझ्या स्वप्नांची

किती अंतं पहाशी आता

आसावला जीव भेटीसाठी..


मी बावरे क्षणोक्षणी

तु अजुनका नं येई

विसरू नको प्रियेला

मी आर्त विरहवेडी..

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न