विठू तुझे चरणी माझा

राहो निर्मळ भक्तिभाव

तुजविण न दिसो काही

राहो आजन्म एकरूप


मी तू ची न व्हावी बाधा

संत संग देई सदा

तुजवीण आस नाही

भेटी दे लवलाही


विठ्ठल विठ्ठल गजर

राहो मनी ध्यानी स्वप्नी

एकतारी जैसे बोले

तैसे राहू एकनामी 


नको प्रपंचाची चिंता

नको आस मायेची

तूझ्याच पायी राहूदे

माझी मती ही सारखी


जगाचा कैवारी तू नाथा

होवू दास तुझे चक्रपाणी

उन्मनी होत आहे आता

न दिसे तुजवीण काही


जळी स्थळी काष्ठी पाषाणी

दिसे हरी उभा दशदिशांतही

पुजायाला तूला देवा आता

उरलो न मी झालो हरी

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न