*नववधू आम्रतरू* 


सौ.स्वरूपा कुलकर्णी


हिरवा हिरवा शालू जणू अंगभर ल्यायली,

हिरव्या आम्रतरूची ही नवरी कशी सजली


जर्द हळदी पिवळे ऊन माखले सर्वांगाते,

रूप तरूण साजिरे नखशिखांत खूलते 


पाना पानांवर सजली मेहंदी बारीक नक्षीची,

पर्णसंभार डूले वाऱ्यासवे जणू नवरी लाजली


अंगभर हिरवा शालू साजरे रूप आम्रपल्लवांचे,

आकाशाशी लागले लग्न भर पावसात तीचे


चमचमली पाने हिरवी पावसाने चिंब नाहती,

नवरी अंगभर शहारते लागली टाळी रानावरती


सनई चौघडे वाजती मेघ बरसती चोहिकडे,

क्षणात लागले लग्न निळ्या अवकाशाशी तिचे


नववधूला भेटायाला वारा घाली मधुनच पिंगा,

आकाशीचा रविराजा देई आशिष नववधुला


वर्षाराणी घेऊन येई आहेरांच्या लक्ष सरी,

नववधू लाजून चूर होई जडले नाते आकाशाशी


गार वारा असा शहारा नवदांपत्य खुलून जाई

पावसाळी ऋतू ओला नववधू चिंब होई

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न