दासबोध - मला भावलेला
सौ.स्वरूपा कुलकर्णी
अध्यात्म म्हटलं की खूप जण हा काहीतरी बोजड, अवघड विषय असावा असे समजून खूपच दूर होतात.तर काहींच्या मते हा Retirement नंतरचा उद्योग! पण खरचं याचा अभ्यास केलात तर कळेल हे तर साधं दैनंदीन आयुष्याचं गणित होतं. लवकर कळलं असतं तर चुका सुधारता आल्या असत्या.
समर्थांचा दासबोध हा असाच एक अध्यात्मिक ग्रंथ..अगदी आजच्या भाषेत सांगायचा तर प्रॅक्टिकल गोष्टी करायला सांगणारा मार्गदर्शक वाटाड्या आहे.
श्रोते पुस्ती कोन ग्रंथ । काय बोलिले जी येथ।
श्रवण केलियाने प्राप्त।काय आहे।।
समर्थांनी दासबोधाची सुरुवातच या ओवीने केली आहे. सर्वसाधारणपणे कोणतीही नविन वस्तू हातात पडल्यावर ती
काय आहे, ती उघडून पहाता येईल का १, तीचा उपयोग काय ? असे प्रश्न सर्वाना पड़तात. तसेच या ग्रंथाची खासियत ही की सुरुवातीलाच समर्थानी स्वतःच प्रश्न उभा केला आहे की हा कोणता ग्रंथ ? यात काय लिहिलय ? याच्या श्रवणाचे फायदे काय ? बघा, समर्थानी दूरदर्शीपणे पूढच्या पिढ्यांसाठी घ्या ग्रंथाची रचना केलेलीदिसते.
दुसरी ओवी लगेच घ्या प्रश्नांची उत्तरे देतांना समर्थ म्हणतात-
ग्रंथा नाम दासबोध । गुरु-शिष्यांचा संवाद । येथे बोलिला विशद । भक्तिमार्ग ।। श्री राम ।।
ग्रंथाचे नाव दासबोध, हा गुरु-शिष्यांचा संवाद आहे आणि या ग्रंथात भक्तिमार्ग विषद केलेला आहे हे इतके स्पष्ट त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीलाच सांगीतले आहे.
दासबोधाच्या रचनेबद्दल सांगतांना समर्थांनी रायगड जिल्हयातील शिवथरघळ या ठिकाणी हा ग्रंथ त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामींकडून तो लिहून घेतला. शिवथरघळ हे खरोखर भेट देण्यासारखं ठिकाण आहे. येथील वातावरण फारच सुंदर आहे. दोनदा जाऊन आलिये. खरोखर पाय निघत नाही. समर्थांच्या दासबोधात ५७५१ ओव्या आहेत. यात २० दशक असून प्रत्येक दशकात १० समास आहेत
एक- एक समास आपली खरोखर कानउघडणी करतो. आपण दैनंदिन आयुष्यात किती चूका करतो. खरं सांगायचं तर दैनंदिन आयुष्यात देवाची काय गरज असे वाटणारे लोक असतात. किंवा आपणालाही देवाची आपल्या आयुष्यात खरचच गरज काय हे नीट कळालेले नसते. पण दासबोध हातात घेतल्यावर ओवी- ओवीतून समर्थातील गुरु-सद्गुरू आपल्याला आयुष्यातीत सर्व बाजूवर प्रकाश टाकायचं काम करतात. आपण करत असलेल्या चूकांमूळे आपली स्वतःचीच प्रगती आपण रोखून ठेवतो आहोत हेच आपल्या लक्षात येत नाही. समर्थांनी, मूर्खलक्षणे सांगितलीयत, कुविद्या लक्षण सांगितलीयेत, उत्तम लक्षणे देखिल सांगीतलीयेत. समर्थांनी सर्वसामान्य व्यक्ती ते अधिकारी साधका- पर्यंत सार्यांनाच मार्गदर्शन केलंय.
समीर्थांचे व्यक्तीमत्त्वच रोखठोक आहे हे दासबोध वाचतांना पावलोपावली जाणवतं. स्पष्टपणा, व खरेपणा हा त्यांच्या रचनेना गुण आहे. ते खरे गुरु आहेत जे शिष्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात.समर्थांचे विचार मग दासबोध असो की मनाचे श्लोक, आत्माराम असो की अभंग-सवाया ते सर्व समाजाला जागे करायचं काम करतात. गूळमुळीत, रटाळ, बेगडी, वरवरचं असं त्यांच्या लिखानात कुठेच नाही ते कायमच स्पष्ट, स्वच्छ, हितकारक बोलतात आणि हेच त्यांन वैशिष्ट्य आहे. रोखठोक बोल असल्यामूळे श्रोता, वाचक जराही इकडे-तिकडे होत नाही व त्यांनी दिलेला उपदेश सहजपणे ग्रहण करत जातो. त्या रोखठोक पणाच्या मूळाशी त्यांची समाजाविषयीची तळमळ, रामरायाविषयीची प्रखर व जाज्ज्वल्य निष्ठा, सर्वसामान्य लोकांनाही भक्तीमार्गात आणण्यासाठीचा ध्यास हे ध्वनित होत रहातं. समर्थाचा दासबोध है त्यांचेच प्रतिबिंबच आहे.
समर्थांच्या दासबोधात व्यावहार, राजकारण, समाजकारण, अध्यात्म, यासाया विषयांचा उहापोह आहे. समर्थ व शिवाजी महाराज हे गुरु-शिष्य हे साऱ्यांनाच ठाऊक आहेच. समर्थांनी त्या काळात दूरदर्शीपणे ग्रंथरचना करताना आजच्या काळाचाही विचार केलेला दिसतो.
जगांत राहून जगाचेच होऊन गेलेल्या आपल्या - सारख्या सामान्यांना समर्थ जागं करतात रामरायाला आळवायला सांगतात. कारण, ह्या सुखदुःखाच्या चक्रात अडकून कोणीच खरा सूखी झाला नाही.
जगी सर्व सूखी असा कोण आहे । विचारी मना तूची शोधूनी आहे पाहे । ।।
असे समर्थ सांगतात. कीती खरयं Facebook, whatsap वर status टाकून दुःख लपवता येईल पण मन तर साक्षीदार आहे. तुम्ही कुठेही गेलात तरी तूमच्या सोबत आहे. दुःखापासून दूर जाता येणार नाही.
म्हणूनच, इथेच खरी अध्यात्माची गरज आहे हे समर्थांना सांगायचय की खरच मनापासून काही लपत नाही किंवा मनामुळेच आपण दु:खी आहोत. मग यावर उपाय काय तर बुद्धीला हाताशी धरून मनाला सावरायचे काम करायचे आहे. आत्मा हे आपले खरे स्वरूप असून शरीर, मन, बुद्धी ही वरवरची अंग आहेत हे अध्यात्म आहे. आत्म्यावर focus करायचं.मनाला, बुद्धीला भगवद्भक्तीकडे वळवणे फार महत्त्वाचे आहे .आपण जे आहोत त्याच्यासाठी श्रम केले तर खरे. आपण झाडाच्या मुळाशी पाणी घातले तर झाड डवरते. आत्म्याला समाधान व शांती मिळाली तर आपण आतून खुश राहू व बाहेरही खुश दिसू. त्या वरवरच्या Makeup ची गरज नाही तुम्ही खरोखर सुंदर दिसाल. कारण राम प्रत्येकात आहे जो मूळातच सुंदर आहे.
एकूणच अध्यात्म म्हणजे काय तर हृदयातला राम खुश करणे व प्रत्येकात राम पहाणे हे होय.
त्यासाठीच समर्थानी भक्तीमार्ग सांगीतलाय जो मोक्षमार्ग आहे. जो जन्म-मृत्यू चक्रातून कायमसाठी सूटका करून देतो.
।। जय जय रघुवीर समर्थ।।
Comments
Post a Comment