*मर्यादा पुरूषोत्तम* 


।।जय श्री राम।।


- सौ. स्वरूपा कुलकर्णी


धन्य धन्य तू सीतापती 

कौसल्यासूत रामा।

करीतो नमन तूज चरणी 

ह्रदयी प्रेम दे रघुत्तमा।।


तू विशालबाहू त्रिकालदर्शी

वनवास तो भोगिला।

धन्य रमापती तुम्ही दाविली

वचननिष्ठा जगाला।।


राम लक्ष्मण सवे जानकी

केला प्रपंच घोर वनी।

नाही झाले उद्विग्न कधिही

जीवन भरले दुःखांनी।।


जनकनंदिनी सीतामाता

रावणाने पळविली।

दुःखी राम गाळी अश्रू

प्रिय जानकी साठी।।


राम करी युद्ध तुंबळ

रावण रणी पाडला।

जिंकून लंका जय लाभला

सीतापती शोभला।।


अग्निपरिक्षा सीतेची जरी

राम जाणतो अंतरी।

सीता माझी शुद्धच आहे

नाही कलंक तिजवरी।।


मर्यादा सारी चरित्र अवघे

रामप्रभू मनी जाणती।

लोकांसाठी अग्निपरिक्षा

सीतापती करवी।।


मग परतती राम तेंव्हा

अपुल्या अवधपुरीसी।

दशरथनंदन राम जाहला

राजा अयोध्यापती।।


मारूतीसवे वानरसेना

राही रामापाशी।

राम करी राज्य सुखाचे

राजा रघुराई।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न