प्राजक्तं


- सौ. स्वरूपा कुलकर्णी


चल सांगतो मी तुला फुलाची ती कथा,

रंगबावरा निसर्ग कसा गुंफतो पाकळ्या


प्राजक्तं फुल उमलते कळीतून गोजिऱ्या

केशरी देहदंड पाच पांढऱ्या पाकळ्या


फुल सुकूमार कोवळे पानापानातुन बाहेरं

जणू बाळ इवलेसे पाही आईच्या पदरातुन


पहाटेच्या नक्षत्रवेळा जणू चांदणे खाली येई

फुल जन्म घेई तेंव्हा चांदण्यांचाही जन्म होई


फुल सुंदर गोजिरे साही थेंब तो  दवाचा

फुलावर  शिंपले अत्तर दशदिशांनी अहा!


अशा नाजुक वेळेस आला क्षण विरहाचा

सुर्य जन्मता डोंगरी झाला पसारा किरणांचा


प्राजक्ताचे झाडं जणू ढाळी अश्रु दुःखाचे

टपटप फुले गळती सारे मातीत अवघे


स्वर्गातले दिव्य तरू वसुधेच्या कुशीतं 

पाही रूप जग सारे कोमल प्राजक्तं फुलांचे

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न