पाखरू


 सौ.स्वरूपा कुलकर्णी


उन्हाच्या काहिलीत पानंही हलेना

उष्ण झळ्या त्या जीवा सोसवेना


अशा गरम दुपारी कुठूनसे अवचितं

निळे पाखरू आले अंगणी नकळतं


मनी हर्षले किती सुंदर रंग त्याचे

कुठून आले भर दुपारी अंगणी ते..


शोधित पाणी नजर त्या जीवाची

गेली अवचित अंगणात बादलीशी


क्षणार्धात झेपावली काया त्याची

आकंठ प्यायला जल तृप्ती त्या तृषेची


मग करूनीया किलबीलाट स्वतःशी

हिरवी पाने हसली पाखरा पाहुनी


तहानलेल्या जीवा मिळाला दिलासा

पाहुनी मोगरा झाला सुगंधी केव्हडा 


तशातच आला जवळूनी स्वर माझ्या

खांद्यावरी बसुनी गायला पक्षी वेडा


निळ्या चोचीतुनी गायला सुखाने

धन्यवाद दिले मला जणू पाखराने

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न