नमस्कार🙏
माझं नाव आनंदी..
डॉ. आनंदी गोपाळराव जोशी
आज तुम्हाला माझी छोटी जीवनगाथा सांगणार आहे.माझा जन्म ३१ मार्च १८६५चा. मी माहेरची यमुना.
गणपतराव जोशींची ज्येष्ठ कन्या. वयाच्या ९ व्या वर्षी माझा विवाह माझ्याहूनही वयाने २० वर्ष मोठ्या बीजवराशी गोपाळराव जोशींची झाला.गोपाळराव हे मुळ नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे.लग्नानंतर माझे नाव यमुना बदलून आनंदी ठेवले गेले.लग्न झाल्यापासूनच गोपाळराव मला अभ्यास करायसाठी मागे लागत. कविता , धडे पाठ करायला सांगत. ती नाही केली तर मारहाणदेखील करत.त्या काळी मुलीने स्वयंपाक केला नाही तर तीला नवरा मारहाण करी पण माझ्या नशीबी वेगळाच प्रकार लिहिला होता.अभ्यास नाही केला म्हणून मी मार खाल्ला.वयाच्या १४ व्या वर्षी मला मुलगा झाला. पण वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे तो वारला. मी दुःखी झाले.ही मात्र माझ्या आयुष्यातली महत्वाची घटना. या घटनेनंतर मी डॉक्टर व्हायचे ठरवले.ह्यांनी लोकहितवादींची शतपत्रे वाचली होती. त्यांचे विचार पुरोगामी होते. स्त्रीयांनीही इंग्रजी , संस्कृत शिकावं या विचारांचे ते होते. माझी अभ्यासातली गती पाहून ह्यांनी माझ्या वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत पत्रव्यावहार केला.परंतु हे शिकण्यासाठी ख्रीस्त धर्म स्विकारण्याची अट होती. मला व ह्यांना ही अट अजिबात मान्य नव्हती.पुढे ह्यांनीच चिकाटीने हा विषय लावून धरला व वयाच्या १९ व्या वर्षी मला अमेरिकेतील विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनिसिल्ह्विनीयामध्ये प्रवेश मिळाला.तिथल्या नविन वातावरणाचा व प्रवासाचा प्रकृतीवर वाईट परिणाम झाला.परंतु कारपेंटर जोडप्याचे सहाय्य मिळाले.
सुरवातीला माझ्या या डॉक्टर होण्याच्या निर्णयाचा देशभरात विरोध झाला. पण मी कोलकाता येथे एक भाषण केले. त्यात भारतात डॉक्टर महिलांची किती आवश्यकता आहे हे सांगितले. मी याकरता हिंदू धर्म सोडणार नाही हे सर्वांना पटवून दिले. ह्या भाषणाची खूप चर्चा झाली व देशभरातून मला शिक्षणासाठी पैसा उभा करण्यात आला.तत्कालीन व्हाईसरॉय यांनी २०० रू यांचा फंड जाहिर केला. कष्टाच्या व मेहनतीच्या जोरावर मी एम.डी. चा अभ्यासक्रम २ वर्षातच पूर्ण केला.मार्च १८८६ ला मला एमी डी ही पदवी मिळाली.त्यासाठी " हिंदू आर्य लोकांमधील प्रसुतिशास्त्र " हा प्रबंध मी निवडला होता.राणी व्हिक्टोरियाकडून मला अभिनंदन संदेश आला. स्वतः गोपाळराव तसेच पंडिता रमाबाईही ह्या पदवीदान समारंभाला उपस्थित होत्या.
एम डी झाल्यावर मी भारतात येऊन कोल्हापूरात स्त्रीयांसाठी आरोग्य कक्षातून सुरूवात केली.परंतु मला क्षयाने ग्रासले. वयाच्या २१ व्या वर्षी मृत्यु आला.
कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू
कधी भामिनी वा कधी रागिणी
सहस्त्रावधी सुर्य झुकतात जेथे
स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी
Comments
Post a Comment