#प्रवास 

#आठवणी 

#उटी

लेख क्र ३

   -सौ. स्वरूपा कुलकर्णी


     म्हैसूरला सुबोधच्या कस्टमर्सकडे अत्यंत जोरदार आतिथ्य स्विकारून उटीकडे प्रयाण केले. उटी हे उदगमंडलम् या नावानेही ओळखले जाते. हे तमिळनाडू राज्यातील थंड हवेचे हिल स्टेशन आहे.येथिल बोटॅनिकल गार्डन, बोटींग, चहा व कॉफीचे मळे अत्यंत सुंदर अनुभव देतात. प्रथमतः आम्ही हॉटेलवर रूम बूक केली. त्या रूममधिल मोठ्या खिडक्यातुन उटीचे नैसर्गिक सौंदर्य दृष्टीस पडत होते.हवा उबदार होती फार थंड नव्हती. तिथे थोडा हिरमोड झाला कारण उटी म्हंटल्यावर थंडी खूप असेल या भावनेने बऱ्याच तयारीत आम्ही आलो होतो.त्यानंतर सगळ्या दक्षिण भारतात मिळणारा इडली,रस्सम्, वडा सांबार खाल्ला.खरंतर एव्हड्या प्रवासात सगळीकडे आलटून पालटून तेच पदार्थ खाल्ले पण खरं सांगू आम्ही दोघेही अजिबात कंटाळलो नाही.कारण आम्ही दोघेही इडली-डोसा लव्हर! मग काय एकुणच चंगळ होती.कुठेही कंटाळलो नाही.

     निलगिरीच्या हिरव्या पर्वतरांगांतून चहा कॉफीचे मळे फारच सुखद दर्शन देत होते.तिथे मला " साजन" पिक्चर मधिल माधूरी व संजय दत्तच्या गाण्यांची आठवण झाली.फार रोमॅंटीक वातावरण होतं.मुळातच हे कपल्सचं गाव असल्याप्रमाणे जो तो आपल्याच विश्वात गूंग होता.बोटींग करतांना व बोटॅनिकल गार्डन पहातांना मन पिसासारखं हलकं हलकं झालं. सुबोधच्या हातात हात घट्ट गुंफून सगळं निसर्गसौंदर्य न्याहाळलं.त्याची तिथे नेहमी " मी आहे ना" ची काळजी बायको म्हणून मला फार महत्वाची वाटली. त्याचं "तुझी साथ कधिही सोडणार नाही" चं अभिवचन फार खरं होतं हे आजही किंवा भविष्यातही तसंच राहील हे फार आतुन जाणवलं.जणू Made for each other हे वाक्य आम्हाला लागू होत होतं.आम्ही सुखाने त्या प्रवासात एकमेकांचा सहवास अनुभवला. 

        उटीत डोंगररांगा अतिशय नयनरम्य आहेत.तिथेच पठारावर फोटोग्राफरकडून फोटो काढून घेतले.आजही जपून ठेवलेत हे सांगायलाच नको. निसर्गातील अनोखे सृष्टीसौंदर्य अनुभवत फिरत राहीलो.उटीच्या त्या उबदार आठवणी आजही मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. लग्नानंतरची ती पहिलीच ट्रीप यादगार ठरली.उटीतील चहाचे पाकीटं घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. सोबत  बॅंगलोरच्या श्री.सत्यनारायण सरांनी  दिलेल्या आहेरातली साडी, इतर बॅंगलोरच्या आतिथ्यप्रिय घरांतल्या भेटवस्तू,  म्हैसूरला ही मिळालेले गिफ्टस् घेऊन प्रवास थोडा नव्हे चांगलाच जड झाल्याचे जाणवले.पण आनंदाने दिलेल्या त्या भेटवस्तू ओझं वाटत नव्हत्या हेही खरंच. 

          दक्षिण भारत अत्यंत निसर्गसंपन्न आहे हे ह्या प्रवासातून विशेष अधोरेखित झालं. परतीचा प्रवास खूप काही आठवणींचे सुंदर क्षण ओटीत टाकून मला सदा सुखी रहा असा आशिर्वाद देऊन गेला. परततांना मी व सुबोध मनोमन सुखावलो होतो. जीवनभर आठवणीत राहील असे हे आनंददायक क्षण "फिर मिलेंगे" म्हणत निघुन गेले. आम्ही परत परत काचेतून वळून निलगिरीकडे पहात अलविदा म्हणत राहीलो ..

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न