रचना- सौ.स्वरूपा कुलकर्णी
"चाहूल वसंताची"
गारवा- थंडी हवेतली ही
हळूहळू ओसरू लागली,
गरमीची ऊब थोडी थोडी
वातावरणात पसरू लागली
किती हलकेच त्याची चाहूल
ऊबदार स्पर्श सोनेरी,
आंबा मोहोरला हळूवार
डोले पानापानामधूनी
जादू वसंताची झाली
पानोपानी तरूतरूवरी,
फुलला मोगरा पानातुनी तो
उसळतो सुगंध चहूबाजूंनी
सूर्यदेव प्रसन्न वसंताला
झाडे चैतन्याने न्हाली,
ही सृष्टीतील नवउर्जा
मन आनंदाने गीत गाई
सुगंध फुलाफुलांचा
पळस लालेलाल होई,
गुलमोहर बहरतो आता
फुलला वसंत चराचरी
Comments
Post a Comment