प्रेमकविता

 


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी



प्रेमाचा तुझा रंग कसा ?

लाले लाल,गुलाबी की गर्द हिरवा?

मत्त मयुरी,फिकट पोपटी 

की सावळा घननीळा...


प्रेमा तुझा गंध कसा?

परिमळ प्राजक्ताचा की फाया अत्तराचा?

घमघमणार्या मोगर्याचा की गंध केवड्याचा...

मला भासे दरवळ चंदनाचा !!


प्रेमा तुझी फुले कोणती?

सुगंधी गुलाब की गजरा जाईचा?

चाफ्याचा की मोगर्याचा

मला वाटे हा तुळस मंजिरीचा!!


प्रेमा तुझे संगित कोणते?

तबला पेटी की स्वर संतुरीचा?

सनईचा की विणेचा?

मला वाटे हा वेळूच्या वेणूचा!!


 प्रेमाची ही दुनिया न्यारी

निसर्ग मानव एकत्वाची,

राधेच्या समर्पणाची,

कृष्णाच्या अमुर्ततेची...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न