विषय- फुललेला बगीचा
कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी
आज माझ्या बागेत उमललय कोण?
हळूच जाऊन बघते तर दिसतंय कोण..
गुलाबी गुलाब प्रेमाचे प्रतिक,
डौल त्याचा वर्णावा कसा नी किती?
कोपर्यात उमलली जास्वंदीची फुले,
लाल फुलांचा हार गणपतीसा शोभे
अबोली फुलांचा रंग मोठा खास,
सुंदर आकार नी डौलदार पाकळ्यांचा साज
भरीव गोल सुवासिक शेवंती पांढरी शुभ्र,
बहरते एव्हडी की झूकते होऊन नम्र
जो तो ह्या सोनचाफ्याचा दिवाणा,
हातात घेऊन सुगंध घ्यावा वाटे सर्वांना
सुगंधी नाजूक पांढरीशुभ्र जाई नी जुई,
हिला पाहून मन कसे हरखून जाई
नाजूक दिसे परी याचा आहे मान,
सुगंधी दरवळ उठतो हा पारिजातक छान
लाल पिवळ्या फुलांचा झाला याला भार,
वसंत ऋतूत बहरतो गुलमोहर फार
जन्माष्टमी कृष्णाची अन् फुल दिसे वेलीला,
सुंदरसेहे कृष्णकमळ उमलले दिमतीला
लाल सुंदर कमळ देवी लक्ष्मीचे आसन,
विष्णू देवाच्या हाती शोभे याच् स्थान उज्वल
बारामासी सदाबहार झाड याचे डवरलेेले,
छत्रीसारखे पांढरे फुल चोहिकडे बहरले
बोगनवेल लाडकी आहे सार्या जगाची,
हिच्या असण्याने शोभा वाढते जागेची
अशा या सुंदर फुलांच्या सुंदर सुंदर कथा,
मी झाले मंत्रमुग्ध सहवासाने त्यांच्या
Comments
Post a Comment