'या सुखांनो या'
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
झोप काळोखी अंधाराची
नाही कवडसा सौख्याचा,
मन विषण्ण तगमगणारे
नाही शांती एव्हडीशी...
जग माझे उदास उदास
नाही त्यात किरण आशेचा
मी वाट पहातो उद्याची
कधी दिसे सुर्य सुखाचा..
मी कवटाळले सारे
दुःख माझे जरतारी
व्यथा वेदना जहरी
तरी आशा वाटे अनोळखी...
शांत आकाश हे सारे
आली झुळूक जराशी,
मी पहातच राही
प्राची थोडी प्रकाशली..
झाली पहाट हळूवार
सारे उजाडले रानं,
गुणगुणती पाखरे
गाती " या सुखांनो या"हे गीतं...
Comments
Post a Comment