कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी
मुखवटे...
बदलतो मुखवटे असे क्षणोक्षणी,
रंगबदलू या दुनियेची रितीच तशी
मी फक्त माझा ,नाही कुणाचा
मला काय आस्था जगाची ती..
माझे बदलती रंग आणि राग,
बदलती मुखवटे तसे तसे...
मी आत आहे तसा अगदी साधासुधा
जगापुढे मात्र उभा मुखवटा धरूनी...
असा माझा रंग बदले क्षणोक्षणी
सगळ्यात असुनही मी उरलो एकटा...
Comments
Post a Comment