महासत्ता

 जगातील (World) सर्वात बलाढ्य देशांची (Powerful Nations) यादी बनवायची असेल तर केवळ आर्थिक आणि लष्करी शक्तीचे प्रमाण पाहिले जात नाही. यामध्ये अनेक घटकांचा सहभाग असू शकतो. नेतृत्व, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, जागतिक स्तरावरील मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध यासारख्या घटकांचा समावेश करून या देशाला जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यात पहिल्या पाचमध्ये अमेरिकेसह चीन आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे.

जग युद्धाच्या (World) छायेत असल्यामुळे आज जगातील सर्वात शक्तिशाली देश (Powerful Countries) कोणता हे जाणून घेणं महत्वाचं आहे. येथे शक्तिशाली असण्याचा आधार काय आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. जगभरातील वर्तमानपत्रांच्या मथळ्यात राहणे पुरेसे आहे की आर्थिक शक्ती (Economic power) किंवा लष्करी शक्ती किंवा दोन्ही गरजेचं आहे. यूएस न्यूजने सर्वात शक्तिशाली देशांच्या क्रमवारीत परराष्ट्र धोरण आणि लष्करी बजेट यासारख्या अनेक घटकांचा समावेश केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील देशांवरील त्यांचा प्रभाव हाही मोठा घटक मानला गेला आहे. या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत 13व्या स्थानावर आहे. 

अमेरिकेला (USA) जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हटले तर क्वचितच कोणाला शंका येईल. अमेरिका सध्या जगातील सर्वात मोठी आर्थिक (Economic power) आणि लष्करी शक्ती आहे. केवळ 245 वर्षे जुन्या या देशाचा जागतिक स्तरावर खोलवर प्रभाव आहे. या देशाचा सांस्कृतिक इतिहास जरी जुना नसला तरी विविध लोकांनी या देशात आपले सांस्कृतिक योगदान दिले आहे. आधुनिक विकासामुळे या देशाची टेलीव्हिजन, सिनेमा आणि संगीतातही जगातील अव्वल देशांमध्ये गणना होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासातही याने जगातील सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे. येथील डॉलर हे जगातील सर्वात शक्तिशाली चलन आहे.

सध्या जगाला आर्थिकदृष्ट्या आव्हान देण्याइतका सक्षम देश असेल तर तो चीन (China) आहे. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या या देशाची कामगार संख्या ही सर्वात मोठी ताकद आहे. गेल्या दशकाच्या अखेरीपासून चीनने झपाट्याने प्रगती केली आहे. आज ती अमेरिकेनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती (Economic Development) आहे. शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या नेतृत्वाखाली चीनने जागतिक स्तरावर आपला दबदबा वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात त्याचा सहभाग झपाट्याने वाढला आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात मोठे पायदळ चीनकडे आहे. आधुनिक शस्त्रास्त्रांमध्येही तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. अवकाशाच्या क्षेत्रात तो खूप वेगाने पुढे आला आहे.

     भारताला पुढे जायचे असेल तर महाशक्तींना टक्कर द्यावी लागणार आहे.त्यासाठी सर्वच क्षेत्रातील विकास महत्वाचा आहे.शेती हा आपला आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे.त्यात नवनविन तंत्रज्ञान वापरून शेतीतील उत्पादनांत वाढ होणे महत्वाचे आहे.

   सर्वच बाजूंचा विकास हाच महाशक्ती होण्यामागची गुरूकिल्ली आहे.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न