ही गुलाबी हवा

सौ.स्वरूपा कुलकर्णी

ही गुलाबी हवा मला
सांगते गूज नवे नवे,
तुझिया माझिया प्रितीचे 
भावदर्पण अलवार ते

गारवारा तो भरारा
वेढला पानाफुलांभोवती,
मी सहज गुंफले
हात तुझ्या हातात ते

स्वर्ग दोन बोट उरला
जाहला श्वास वेगवान तो,
मी अनावर जाहलो
तुला पाहूनी जवळी हे

स्पर्श तुझ्या थंड बोटांचा
विझवी तप्त अग्नी तो,
जो माझिया ह्रदयात पेटला
सुप्त अनावर प्रखर तो

मी पाहतो तुला साथी जन्मोजन्मीचा,
न राहू शकेल तुजवीण
मी प्रेमी युगायुगांचा

भेट ही गुलाबी साजिरी
मन ही दाटले भावनांनी ते,
किती जीवा सुखावतो
ऋतू  हा प्रेमीयुगूलांचा

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न