कुटूंब
सौ.स्वरूपा कुलकर्णी
कुटूंब ही समाजव्यावस्थेची पहिली पायरी आहे. अनेक कुटूंबाचा समुह म्हणजेच गाव.ही पहिली पायरी व्यक्तीच्या मानसिक,शारिरीक,भौतिक गरजांसाठी अत्यंत महत्वाची आहे.कुटूंबाद्वारेच संस्कृतीचे रक्षण व पोषण होते.समाजहीत जपल् जाते.जबाबदार कुटूंबं ही राष्ट्राची खरी संपत्ती होय.कुटूंबातील प्रमुख व्यक्ती ही कुटूंबाचं मार्गदर्शन करते. भारतीय कुटूंबव्यावस्था ही एक आदर्श कुटूंबव्यावस्था आहे.आजी-आजोबा ही बुजूर्ग मंडळी, तसेच आई-बाबा ही पालक मंडळी, त्यांची अपत्ये ही तिसरी पिढी.पुर्वी भारतात कुटूंब ही मोठी होती.अनेक नातेवाईक एकत्र रहायचे.सख्खी-चुलत, नातवंड-पतवंडं एकत्र रहायची.त्यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असे.आता कालमानानुसार कुटूंबं छोटी झाली.नोकरी-व्यवसायामूळे लोकं परदेशात गेली.बदलत्या जीवनशैलीनुसार जगणं ही स्पर्धा झाली.नात्यातील वीण ढिली झाली.पुर्वीचा आदर नात्यात न राहिल्याने कुटूंबं लहान होत गेली.
आज आपण पहातो की कित्येक घरे घटस्फोटाने किंवा अकस्मात मृत्यूमुळे ढासळत गेली.नाती सांभाळण्यापेक्षा ती तुटण्यातच काळ बांधिल झाला.हे वारे चुकिच्या दिशेने वहात असले तरी यात एक आशेची किनार आहे.अजुनही काही घरे कुटूंबप्रमुखाला आदर देतात.आजही काही गोष्टी नात्यांला जवळ आणतात.जगणं सुखकर होण्याच्या नादात माणुस आपल्या माणसांपासुन परका होतोय.परंतु काही माणसे आजही पर्वतासारखी अचल राहून कुटूंबव्यावस्था जोडून ठेवण्याचा उदात्त प्रयत्न करत आहे.
कुटूंबाला वेळ देणे हे आजच्या आई बाबांसाठी कसब आहे. त्यांच्या नोकरी-धंद्यातून मुलांसाठी वेळ काढणे अवघड होऊन बसलेय.ही समस्या संपूर्ण जगाची समस्या बनलीये.मुले तासन्तास मोबाईल,व्हीडीओ गेम पहाण्यात रमलिये पण आपल्या पालकांशी निसर्गाशी संवाद करायला मुकलीये.ही जगण्याची लढाई जटील समस्येच्या रूपात फेर धरू लागलीये.घरात मोठ्या माणसांची उणिव जाणवतेय.वेळप्रसंगी कठिण प्रसंगात आधार देणारी मोठी माणसे वृद्धाश्रमात गेलियेत.मोठमोठ्या शहरांत तर ही समस्या उग्र स्वरूप धरून आहे.हे स्वरूप भविष्यासाठी घातक आहे.
कुटूंब टिकली तर समाज विकासाकडे जाईल व राष्ट्र वितसित होईल.नुसते आर्थिक दृष्ट्याच नाही तर मानसिक व भावनिक दृष्ट्याही परिपक्व होईल.
Comments
Post a Comment