शीर्षक - " हसा मुलांनो हसा "
रचना-  सौ.स्वरूपा कुलकर्णी

" हसा मुलांनो हसा "

निळे सावळे माड अलिकडे
आकाशाचे रंग पलिकडे,
चला मुलांनो हीच वेळ ती
नाचू गाऊ गीत नवे नवे

रंग बावरे पक्षी गाती
हसरी फुले, मोर नाचती
छुनछुन छुन छुन पाऊल पडते
हसरे बालक नाचू लागते

संध्येच्या या सदनी बागडू
फुलपाखरांना पाहूनी खिदळू
सोनसाखळीची गोष्टही सांगू
उंच उंच ते पक्षी पाहू

किती किती उंच हा डोंगर
लांबच नदी छोटे ओढे
मस्त झोपू कुरणावर त्या
नको अभ्यास नको काही

अशी ही दुनिया मस्त मजेची
चला सफर करू आनंदाची
हसा मुलांनो हसा
हसा मुलांनो हसा...😃


Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न