महाराष्ट्र राज्य


सौ.स्वरूपा कुलकर्णी



"बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!”

 महाराष्ट्र राज्य हे मुख्यतः मराठी लोकांचं राज्य आहे.त्यात विविध जातीधर्माची व अमराठी मंडळीही गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

     आपण ज्या भागात राहातो म्हणजे ज्या राज्यात आपले वास्तव्य आहे तिथल्या राहाणीमानाची, तिथल्या संस्कृतिची, आसपासच्या लोकांची आपल्याला एक सवय होते आणि आपसुकच आपण त्या वातावरणाचा एक भाग कधी बनुन जातो ते कळत सुध्दा नाही.


उदा. आपण कोणत्याही राज्यात राहात असु तर तिथले सण, तिथले व्यवसाय, परिसर, सण समारंभ आपल्याला जवळचे वाटायला लागतात आणि जरी आपण त्या धर्माचे नसलो तरी तिथल्या संस्कृतीशी आपण इतके घट्ट बांधल्या जातो की आपल्या घरावर देखील त्या वातावरणाचा अमंल राहातोच राहातो.

भारतात भरपुर राज्य अस्तित्वात आहे, साधारणतः आपल्या संस्कृतिशी मेळ खात असलेल्या राज्यांमधे राहाणे आपण पसंत करतो कारण त्या राज्यात कुठेही फिरलो तरी ते ठिकाण, तेथील माणसं आपल्याला जवळची, कुटूंबाचाच एक भाग असल्यासारखी वाटतात आणि मनुष्य हा नेहमी मानवी स्वभावाप्रमाणे सुरक्षीत वातावरणात राहाणेच जास्त पसंत करतो.


महाराष्ट्र राज्य देखील त्याच्या वेगळेपणामुळे, आणि बऱ्याच वैशिष्टयांमुळे भारतातले लोकप्रिय राज्य आहे.

        मंडळी, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. 1960 ला जरी महाराष्ट्र राज्य म्हणुन अस्तित्वात आलं असलं तरी या राज्याला भरपुर मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक राजे महाराजे, समाजसुधारक आणि संतांच्या विभुती या राज्यात जन्माला आल्या हे या महाराष्ट्र राज्याचे सद्भाग्यच म्हणावे लागेल!


छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहु महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याच मातीत जन्माला आलेत. यांच्या कर्तृत्वाने, कर्तबगारीने, त्यांच्या त्यागाने महाराष्ट्र राज्याला आजचा दिवस पहाता आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याने महाराष्ट्र सजला आहे राज्याच्या नकाशावर हे किल्ले जणु माणिकमोत्यांप्रमाणे आजही दिमाखात लखलखतायेत!

   महाराष्ट्र ही साधू स़ंतांची भूमी आहे.वीर जवानांची भूमी आहे.कष्टकरी शेतकऱ्यांची भूमी आहे.

 ह्या महाराष्ट्राने अनेक कर्तबगार पुरूष व स्त्रीया घडवल्या.सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे.ह्या सुजलाम सुफलाम भूमीतून फळे ,फुले,भाजीपाला भरपूर प्रमाणावर पिकतो.देशाला आघाडीवर ठेवण्यात महाराष्ट्र राज्य पुढे आहे.

           जय महाराष्ट्र!!

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न