पुस्तक


    मानवी इतिहासातील अतिशय महत्वाचा शोध म्हणजे पुस्तक छपाईचा शोध! माणसाने त्याला माहित असलेल्या ज्ञानविज्ञानाच्या आधारे अनेक शोध लावले.परंतू पुस्तक छपाईने एक वेगळीच क्रांती साधली.मानवाच्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा या पुस्तकाने घेतलाय.माणसाला ज्ञात असलेल्या गोष्टी त्याने पुस्तकात छापायला सुरूवात केली.त्यातून प्रत्येकाला ते ज्ञान संक्रमित करता येऊ शकले.यातून विचारांची देवाणघेवाण शक्य झाली.जगणं रंजक बनलं.पुस्तकांनी मुलांचे शालेय जीवन बहुरंगी बनले.ती त्यांची ज्ञानशिदोरी बनली.लेखकांची प्रतिभा पुस्तकातून बहरू लागली.नवनवीन सर्जक कला त्यातून उभारी घेऊ लागल्या.कविंच्या कविता फेर धरू लागल्या.विज्ञानातील शोध सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले.जग एकमेकांशी 'जोडले' गेले.पुस्तके विचारमंथनाचे काम करू लागली.चिंतनशील माणसाला पुस्तकांचा फार मोठा लाभ झाला आणि होतोय.सांस्कृतिक देवघेवीत पुस्तकांचा वाटा मोठाय.पुस्तकातील अपरिमीत माहितीचा खजिना मानवी आयुष्यातिल प्रत्येक बाजूवर प्रकाश टाकतात.एकूणच माणसाचे आयुष्य सुकर झाले.तसेच अधिक कार्यक्षम झाले.

       पुस्तके जितकी आपली मैत्री निभावतात, तेव्हडी खचितच कोणी आपल्या आयुष्यात बदल करू शकेल.कारण पुस्तक वाचतांना मानवी मनाशी त्याचा डायरेक्ट संबंध येतो.पुस्तके विचार देतात.जीवन जगतांना या विचारांची साथ फार मोलाची असते.जग खरंच खूप सुंदर आहे याची ओळख बऱ्याचदा पुस्तकातूनच होते.कथा,कादंबऱ्या, विज्ञानातील विविध शाखा,कला,संगित अशा अनेकानेक विविध विषयांवर पुस्तके माणसाला घडवतात.खरोखर पुस्तके मानवी आयुष्यात भूत, भविष्य व वर्तमानात साथ देतात.जगण्याचा निराळा दृष्टीकोन देतात.जगणं सुसह्य करतात.


       पुस्तके माझी सखे सोबती,

        रंग भरती हर वळणावरती,

        मी जर झाले कधी उदास,

        धावत येऊन कुशित घेती...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न