जीवन सुंदर आहे


कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी


सुंदर सुमने सुंदर बहार

सृष्टी प्रभूची निर्मळ फार

तू चहुकडे पहा एकवार

आनंद पसरला चराचरात


मी अन् तू पाहू जग सारे

सौंदर्य रसिकांचे मनामनांचे

किती भूंगे फुलावरी त्या

किती हासती चंद्र अन् तारे


किती जन्म घेती सुंदर बाळे

क्षणाक्षणांना जीवन लाभे

ही अलौकीक रचना प्रभूची

आनंदाने भरले जग हे


मायेच्या ह्या विशाल पंखी

जीवन लाभे हर जीवासी,

किती चांदण्या किती ग्रहतारे

नक्षत्रांची ओळ क्षितीजाशी येते....


जीवन सुंदर आहे

हे जीवन सुंदर आहे

गाती पक्षी गाती वारे

मीही गाते हे गीत साजिरे....

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न