#स्वरूपा
माझ्या आई-बाबांनी माझं इतकं सुंदर नाव कसं काय ठेवलं असा विचार मनात आला..कारण अध्यात्मात व संसारातही स्वरूपा ह्या नावाचा खूप छान अर्थ आहे.त्यातला अध्यात्मिक अर्थ मला जास्त सुखावतो.
स्वरूप अर्थात माझे खरे रूप...
मी कोण?
या प्रश्नाचे उत्तर या स्वरूपात सापडते..
खरंच गम्मत आहे...नावात काय आहे? असे कोणी म्हणेल पण नावातच सगळं आहे हे आपलं अध्यात्म सांगतं..
जर खरा मी गवसलाच नाही तर जगण्याचा हा प्रवास व्यर्थ शीणच ठरतो,हो की नाही?
मला जोपर्यंत खऱ्या मीची ओळखच पटत नाही तोपर्यंत हा संसार व अध्यात्मही व्यर्थ ठरते...
मी अध्यात्म खूप समजते असे नाही पण आजवरचा अभ्यास सांगतो की जर मी या जगात येऊन स्वतःचीच ओळख करून घेऊ शकत नासेल तर माझा हा जीवन प्रवास किती पोकळ व अर्धवट ठरतो..जोपर्यंत मला उमगत नाही की मी कोण तोपर्यंत परमेश्वर कोण ही ओळख मला कशी पटेल?..
जसे सर्व साधुसंत आपल्याला कोSहम् ह्याचे उत्तर मी तो परमात्म्याचाच अंश आहे हे समजावून सांगतात त्याची पहिली पायरी आहे स्वरूप ओळखणे...ही अध्यात्मातली खूप मोठी गहन गुह्य चावीच आहे..
तो मी कोण हे गवसलं की पुढिल काम झालं...एकदा मी जणू ह्या जगाचा केंद्रबिंदू हाती लागला तर त्यावर कंपास ठेवून वर्तूळ काढणे सोपे जाते..हे वर्तुळ म्हणजेच विशाल परमात्म्याची ओळख करून घेणे..
आत्मज्ञानातून परमात्मज्ञान मिळवणे हीच स्वस्वरूपाची ओळख!!!
Comments
Post a Comment