नविन वर्षाचा संकल्प
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
सर्वप्रथम २०२२ ह्या वर्षाचे मनःपुर्वक आभार मानते.कारण ह्या वर्षाने मला काय दिले हे जेंव्हा वळून पहाते तेंव्हा दिसते ती बक्षिसांची,प्रमाणपत्रांची बरसात...हो खरंय हे वर्ष माझ्या 'लेखिका' म्हणूनच्या प्रवासात लाखमोलाचे ठरले...ह्यासाठी माझे पुर्वीचे संकल्प होते हे निश्चितच पण त्याचबरोबर ही ईश्वर नावाची अनामिक शक्ती माझ्यासोबत असल्याची जाणीव मला खूप खूप सकारात्मक उर्जा देऊन गेली.
मी घडले.!!..खरोखर मातीच्या गोळ्याला दिलेला परमेश्वरी कुंभाराचा हस्तस्पर्श!तो चिरस्मरणीय व प्रेरणादायी ठरला...व आता अखंड ते चैतन्य सोबत करणार ही अलौकीक जाणिव देऊन गेला...२०२२ अध्यात्मात प्रगतीकारक व प्रपंचातही नवनविन खरेदी व आनंदाची पर्वणीच देणारा ठरला..
आता उत्सुकता आहे येणाऱ्या नविन वर्षाची...संकल्प आहेत-
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुसंधीचं सोनं करणार..
माणूस म्हणून अधिक प्रगल्भ होणार व त्यासाठी-
नविन पुस्तकांचे वाचन करणार..
नविन माणसे जोडून जुनी माणसांनाही भेटत रहाणार...
चालण्याचा व्यायाम ठेवणार..
मला माझे व्यक्तिमत्व अधिक परिपक्व कसे करता येईल यादृष्टीने वेगवेगळ्या कला जसे संगित,लेखन, अभिवाचन यागोष्टींकडे लक्ष देणार...ज्या माझ्या अत्यंत आवडत्या गोष्टी आहेत..
मंडळी, बघता बघता बरेच संकल्प झाले की😛
पण प्रयत्न करणार ..यश देणं ईश्वराचे काम आहे...कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नकोस हे गीता सांगतेच..मीही प्रयत्न करणार ! ईश्वर सहाय्य करो🙏🏻...😊👍🏻
Comments
Post a Comment