कधी कधी वाटतं....
सौ.स्वरूपा कुलकर्णी
कधी कधी वाटतं
नको नको हे झुरणं
तुझ्यावाचून जगणं
हा दुःसह त्रास सोसणं...
मी का जगू तुजवीण
नाही कशाचीच आस
नाही मन रमत कशात
बस्स उरले रिते क्षण....
कसा साहू हा ऋतू
मी शहारतो आठवांनी
तूझी माझी प्रिती भोळी
आसवांची रात्र मोठी....
मन उदास उदास
नाही उरले कुठले रंग
आता उरलो एकाकी
पहातो वाट मरणाची...
नको उगवणारा दिस
नको रात्रीचा विरह
ही वेदना दारूण
उरले सल घनघोर...
तुजवीण मी पोरका
वहातो अश्रृंचा नित्य झरा
मी तळमळतो सखे गं
घे मिठीत घे अखेरचा....
Comments
Post a Comment