कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी
"दत्त जयंती सोहळा"
दत्तराज माऊली हो माझी
योगिराज माऊली।
करी कृपेची साऊली
माय माझी माऊली।।धृ.।।
सांभाळी जनी निरंतर
प्रेम तयाचे अपार अनंत।
मी लेकरू उपाशी तान्हे
मागे गुरूकृपेचा पायस...।।१।।
नको देवू जन्म पुनःपुनः
लाव नौका पैलतिरी दयाघना।
नसे कोणी समर्थ रक्षाया
तुजवीण गुरूराया....।।२।।
जग हे फसवे निरंतर
मी भूलतो व्यर्थ अज्ञ बालक।
तू माय वाचवी मायाजाळी
मी ऋणी तुझा गुरूमाई...।।३।।
धाव वेगे घे जवळी बाळा
नाही शांतता तुजवीण माता।
घे पाडसा जवळी आई
नको तुजवीण दुसरे काही....।।४।।
Comments
Post a Comment